आईवडील ऊस तोडायला गेले, झोपडीत अल्पवयीन मुली, ते आले आणि उसात..., बीडची संतापजनक घटना!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: मुलीने धैर्य एकवटून आपल्यासोबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर ऊसतोड मजुरांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
बीड: गेल्या काही काळापासून सततच्या गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आहे. आता माजलगाव तालुक्यातील एका गावात घडलेल्या अमानुष घटनेने संतापाची लाट उसळली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक दोघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून सुमारे 14 कुटुंबे माजलगाव तालुक्यातील एका गावात ऊसतोडणीच्या कामासाठी वास्तव्यास आली होती. 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मुलींचे वडील व इतर नातेवाईक शेतात कामासाठी गेले असताना दोन अल्पवयीन मुली आपल्या झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच एका किराणा दुकानदारासह त्याच्या ट्रॅक्टर चालक मित्राने तिथे येत मुलींना फसवून बाहेर नेले.
advertisement
आरोपींनी जबरदस्तीने दोन्ही मुलींना वेगवेगळ्या शेतांमध्ये ओढत नेले. एकीवर उसाच्या शेतात तर दुसरीवर कपाशीच्या शेतात अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या भयभीत झाल्या. त्यामुळे हा प्रकार तात्काळ उघडकीस आला नाही.
चार दिवसांनंतर, 28 डिसेंबर रोजी एका पीडित मुलीने धैर्य एकवटून आपल्यासोबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही नातेवाइकांकडे आपबीती कथन केली. यानंतर ऊसतोड मजुरांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
advertisement
दरम्यान, दोन्ही पीडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने पालकांशी संवाद साधत पीडितांचे समुपदेशन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेशीर मदत, मानसिक आधार व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 1:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
आईवडील ऊस तोडायला गेले, झोपडीत अल्पवयीन मुली, ते आले आणि उसात..., बीडची संतापजनक घटना!











