Beed Exam Case : पुरवठा निरीक्षक परीक्षेत हायटेक कॉफीचा प्रकार! बीडमधील प्रकाराने खळबळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Beed Exam Case : बीड जिल्ह्यात पुरवठा निरीक्षक परीक्षेत हायटेक कॉफीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : पुरवठा निरीक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षेमध्ये हायटेक कॉफीचा प्रकार समोर आला आहे. बीड शहरातील स्वामी विवेकानंद कॉप्युटर सेंटरमध्ये एका परीक्षार्थीकडे मायक्रो डिव्हाइस, एक मोबाइल, वॉकीटॉकी डिव्हाइस, हेडफोन असे साहित्य आढळून आले. या प्रकरणात बीड ग्रामीण ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहू मच्छिंद्र काळे (रा. बकरवाडी, ता.बीड) हा बाथरूममध्ये बराच वेळ थांबल्याने त्याच्यावर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. तो परतल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे मायक्रो डिव्हाइस व इतर साहित्य आढळून आले. त्यामुळे नायब तहसीलदार पी.सी. तांबडे, बीड तहसीलमधील अव्वल कारकून श्रीराम वायभट, संतोष मुळीक यांनी सर्व साहित्य ताब्यात घेतले. सदरील इलेक्ट्रॉनिक साहित्य बाथरूममध्ये जाऊन परिधान केल्याची कबुली परीक्षार्थी लहू काळे याने कर्मचाऱ्यांना दिली. याप्रकरणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
बीड शहरातील स्वामी विवेकानंद कॉप्युटर सेंटरमध्ये अनेक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सदरील परीक्षा केंद्रावर सिग्नल ब्लॉकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे केंद्रावर मोबाइल चालत नाही. ही बाब परीक्षार्थी लहू काळे यास माहिती नसल्याने तो बाथरूमकडे सिग्नल मिळविण्यासाठी गेला व तेथे बराच वेळ तेथे थांबला. यामुळे त्याच्यावर संशय आला व त्यास वेळीच कर्मचाऱ्यांनी पकडले. यामुळे हे हायटेक कॉपी उघडकीस आली यात खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परीक्षार्थीचा कबुली जवाब नोंदवण्यात आला आहे.
advertisement
जालन्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा बोजवारा
view commentsराज्यात 21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. 29 फेब्रुवारी रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा रसायन शास्त्र विषयाचा पेपर होता. मात्र, अनेक उपाययोजना करून देखील जालना जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि आणखी एका महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांना पालक आणि इतर लोक सर्रासपणे चिठ्ठ्या पुरवतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 29, 2024 10:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Exam Case : पुरवठा निरीक्षक परीक्षेत हायटेक कॉफीचा प्रकार! बीडमधील प्रकाराने खळबळ


