Manoj Jarange Patil : 'सगेसोयरे म्हणजे...' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली व्याख्या म्हणाले..

Last Updated:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या शब्दाचा पुन्हा एकदा नव्याने अर्थ सांगितला आहे.

News18
News18
manoबीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या शब्दाची मागणी केली होती. मात्र, या अद्यादेशाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यावर सगेसोयरे अध्यादेश रद्द करुन नव्याने व्याख्या करत अध्यादेश काढण्याची मागणी मराठा समाजातर्फे केली जात आहे. दरम्यान, सगेसोयरे या शब्दाची व्याख्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आहे. दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमात जरांगे पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशं स्वप्न विनायक मेटे साहेब यांचे होतं. मराठा आरक्षणासाठी मेटे साहेब यांचे बलिदान मराठा समाज विसरणार नाही. बलिदान वाया जावू द्यायचे नाही. मागे हटायच नाही, कितीही संकटे येवू द्या. 90% नाही तर 100% मराठा मोठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो मी कधीच जातीवाद केला नाही. आमच्या हक्काच मिळू देणार नसाल तर जातीवाद कोण करतंय ते पहा. मराठवाड्यात 1884 पासुन मराठ्यांना आरक्षण होतं. मराठा समाजाला अगोदर आरक्षण होतं. 57 लाख नोंदी मराठ्याच्या आहेत. त्या रद्द करा म्हणतायेत मग खरा जातीवादी कोण? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
advertisement
तुम्ही आमच्या आंदोलनासमोर आंदोलन, प्रतिमोर्चा काढले. तुम्हाला मिळाले आम्ही तुमचं घेतं नाही. आमचं 150 वर्षा पूर्वीचं आहे ते मागतोय. मराठा समाज आणि लढ्याच्या वेदना कळणार नाहीत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत आहे. लेकरं गळ्याला फास लावत आहेत. जातीवादी म्हणणाऱ्या लोकांना नेत्याना कळणार नाही. तुमच्यासोबत बरोबरी करत नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. ओबीसीमधून आरक्षण घेणारच असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
तुम्ही कितीही टोळके गोळा केले तरी थांबणार नाही, जे होईल ते होईल. घटनेच्या पदावर बसून एकत्र आले तरी काही नाही. आम्ही एकत्रित आलो की जातीवाद? मराठ्याला आरक्षण भेटू नये म्हणुन तूम्ही रात्री झोपत नाहीत. तुम्ही लोकं अडवून गोरगरीब लोकांना त्रास देवू नका. ताई मराठ्यांनी मनावर घेतल तर काहीही होवू शकतं. आडवं चाललं तर कधीच गुलाल लागणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनीही दिलंय.
advertisement
सगेसोयरे म्हणजे काय?
जरांगे म्हणाले, की 1967 ला 83 नंबरवर मराठा होता. 180 च्या नंतर पोट जाती घातल्या कशा? माळी बागवान आणि कुनाबी शेती करतात म्हणुन आरक्षण. मी खर बोलतो माझ्या मनात कपट नाही. मराठा आणि कुणबी एक आहे, 2004 च्या कायद्यात सुधारणा करा. व्यवसाय एक मग पोटजात का होत नाही? सरसकटऐवजी नवीन शब्दासाठी जज आणले. सरसकट नको, सगेसोयरे म्हणजे सरसकट. सगेसोयऱ्याची व्याख्या आमच्या पद्धतीने घ्या. लग्नाच्या सोयरीकिने जोडलेले संबंध म्हणजे सगे सोयरे, अशी नवीन व्याख्या मनोज जरांगे यांनी सांगितली आहे.
view comments
मराठी बातम्या/बीड/
Manoj Jarange Patil : 'सगेसोयरे म्हणजे...' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली व्याख्या म्हणाले..
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement