बीड: मारहाण करत मुलीवर अमानुष अत्याचार, खोक्या भोसलेच्या घरावरील हल्ल्याला वेगळं वळण

Last Updated:

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.

News18
News18
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री उशिरा १५ ते २० जणांच्या टोळक्याने घरात घुसून खोक्या भोसलेच्या कुटुंबाला टार्गेट केलं. आरोपींनी कोयता, लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात खोक्या भोसलेच्या घरातील ४ महिला गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पण हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या घटनेतील हल्लेखोरांपैकी एकाने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून घेऊन जात अत्याचार केला, असा आरोप मुलीने केला आहे. पीडितेनं विरोध केला असता हल्लेखोराने तिला अमानुष मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
advertisement
या प्रकरणी अत्याचार करणाऱ्यासह अन्य १५ जणांविरोधात शिरुर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अत्याचाराचा गुन्हा नोंदवलेला संशयित हा माजी जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे. तर उर्वरित संशयितांमध्ये माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य महिलेच्या पतीचा समावेश आहे. खोक्या भोसले याचे कुटुंबिय सध्या शिरुर शहराजवळ तहसील कार्यालय परिसरात झापेवाडी शिवारात वास्तव्यास आहे. याठिकाणी बेकायदेशीर राहत असल्याच्या आरोप करून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
advertisement

कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि त्याची ओळख भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी म्हणून आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी त्याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण सध्या त्याच्यावर एमपीडीएची कारवाई झाल्याने तो छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीड: मारहाण करत मुलीवर अमानुष अत्याचार, खोक्या भोसलेच्या घरावरील हल्ल्याला वेगळं वळण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement