हाफ मर्डरच्या केसमध्ये तुरुंगात, सकाळी छातीत दुखायला लागलं, दवाखान्यात नेताच...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bhandara Jail Prisoner Death: कारागृहात असताना अचानक शंकर लिल्हारे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला
भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. शंकर सदानंद लिल्हारे (वय 54, रा. सालेबर्डी, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असून 8 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेनंतर त्याला भंडारा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते.
आज सकाळी कारागृहात असताना अचानक शंकर लिल्हारे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. झटका आल्यानंतर कारागृह प्रशासनाने तातडीने त्याला उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयात आणल्यानंतर काही तासांतच त्याने प्राण सोडले.
या मृत्यूची माहिती मिळताच कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक ती नोंद घेतली आहे. दरम्यान, शंकर लिल्हारेवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
advertisement
भंडारा जिल्हा कारागृहात अनेक आरोपी कोठडीत असून त्यांच्यावर विविध गुन्ह्यांचे खटले दाखल आहेत. कारागृह प्रशासनाने या घटनेची गंभीर नोंद घेतली असून आवश्यक त्या पुढील प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.
शंकर लिल्हारे हा गोंदिया जिल्ह्यातील सालेबर्डी गावचा रहिवासी होता. त्याच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर तुरुंगात असताना आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
September 17, 2025 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हाफ मर्डरच्या केसमध्ये तुरुंगात, सकाळी छातीत दुखायला लागलं, दवाखान्यात नेताच...