advertisement

'तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत', पोलीस भरती करणाऱ्या तरुणीकडे शिक्षकाची मागणी, जाब विचारताच जातीवाचक शिवीगाळ

Last Updated:

Crime in Bhandara: भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.

News18
News18
रवी सपाटे, प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी अकॅडमीच्या प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. नराधम प्रशिक्षक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली. या गंभीर घटनेनंतर अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे घडली आहे. नितेश हिवरकर (वय ३९, रा. सोनेगाव ठाणे, ता. पवनी, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. नितेश हिवरकर हा एका पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा प्रशिक्षक आहे. त्याच्याकडे अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश हिवरकरने प्रशिक्षणार्थी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. जेव्हा याबद्दल तरुणीने तिच्या मित्राला सांगितले, तेव्हा या मित्राने प्रशिक्षकाकडे जाब विचारला. त्यावर आरोपीने त्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली.
advertisement
याप्रकरणी तरुणीच्या मित्राने अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नितेश हिवरकरविरुद्ध भादंवि कलम ७५ (२), ३५१, ३५२ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१) (आर), (एस) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत', पोलीस भरती करणाऱ्या तरुणीकडे शिक्षकाची मागणी, जाब विचारताच जातीवाचक शिवीगाळ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement