लग्नाचा विषय निघाला अन् आर. आर.आबांचा लेक आधी लाजला अन् सरळ सांगूनच टाकलं; काय म्हणाले?
- Reported by:Asif Mursal
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तासगाव–कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील सध्या राजकीय वर्तुळात सक्रिय असून त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत असतात.
सांगली : दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार बनले आहेत. अवघ्या 25 वर्षात ते विधानसभेचे सदस्य बनले आहेत. दरम्यान त्यांचं राजकीय कारकीर्द जोमात सुरू झाल्यामुळे त्यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सांगलीतील एका पत्रकार परिषदेत त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनीही हसून तितक्याच चातुर्याने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी दिलेले हे उत्तर सध्या तरुण वर्गात खूपच चर्चेत आहेत.
तासगाव–कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील सध्या राजकीय वर्तुळात सक्रिय असून त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने आमदार रोहित पाटील यांना, “आपण लग्न कधी करणार?” असा थेट प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रश्नावर रोहित पाटील यांनी कोणतीही नाराजी न दाखवता स्मित हास्य करत उत्तर दिले. “आधी लगीन कोंढाण्याचं… म्हणजे अप्रत्यक्ष जिल्हा परिषद निवडणूक पहिली,” असे मिश्किल उत्तर दिले.
advertisement
जिल्हा परिषदेवर लक्ष
रोहित पाटील यांच्या या उत्तरामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला रोहित पाटील यांनी आपल्या उत्तरातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. रोहित पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे.
रोहित पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा
advertisement
सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, अनेक राजकीय नेते रणनिती आखण्यात गुंतले आहेत. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी आपल्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत रोहित पाटीलही संयमी, मोकळ्या स्वभावाचे आणि जमिनीवरचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात . पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेले हे मिश्किल उत्तरही त्याच व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ठरले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 4:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाचा विषय निघाला अन् आर. आर.आबांचा लेक आधी लाजला अन् सरळ सांगूनच टाकलं; काय म्हणाले?










