advertisement

घरात पैशांचा डोंगर, चांदीचा खच; मध्यरात्रीचा थरार, नोटा मोजताना मशीन तापली अन् पोलिसांचे हात दुखू लागले, चांदी गोळा करत कर्मचारी थकले

Last Updated:

Police Raid: पोलिसांनी केलेल्या मध्यरात्रीच्या धाडीने एकच खळबळ उडाली असून एका घरातून कोट्यवधींची रोकड आणि तब्बल 62 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

News18
News18
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांनी केलेल्या एका मध्यरात्रीच्या धाडीने एकच खळबळ उडाली आहे. एका घरातून तब्बल 2 कोटी रुपयांची रोकड आणि 62 किलो चांदी जप्त करण्यात आली. इतकी मोठी रक्कम होती की नोटा मोजताना पोलिसांनाही अक्षरशः घाम फुटला. नोटा मोजण्यासाठी मशीन बोलवावी लागली आणि ही मोजदाद जवळपास चार तास चालली. तर चांदी गोळा करताना पोलिस कर्मचारीही थकले.
ही कारवाई कलेक्टरगंज परिसरातील धनकुट्टी भागात करण्यात आली. या घरातून आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी आणि हवाला नेटवर्क चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून नेपाळी चलनही जप्त करण्यात आले आहे. या धाडीची माहिती मिळताच पोलिस आयुक्त रघुबीर लाल स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची पाहणी केली.
advertisement
अनेक दिवसांपासून येत होत्या तक्रारी
विशेष कार्यबल (SOG) चे एडीसीपी सुमित सुधाकर रामटेके यांनी सांगितले की, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून हवाला व्यवहार, बेकायदेशीर सट्टेबाजी आणि अवैध शेअर ट्रेडिंगबाबत तक्रारी येत होत्या. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजता धनकुट्टी येथील रामाकांत गुप्ता यांच्या घरावर धाड टाकण्यात आली.
पोलिसांनी घराला चारही बाजूंनी वेढा घालून आत प्रवेश केला. घरात मोठ्या प्रमाणावर रोकड आणि चांदीचा साठा आढळून आला. चौकशीत संशयित समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
advertisement
कार्टनमध्ये भरलेली रोकड, 500 रुपयांच्या नोटांचे बंडल
पोलिसांनी कार्टनमध्ये भरलेली रोकड बाहेर काढली. यामध्ये प्रामुख्याने 500 रुपयांच्या नोटांचे बंडल होते. फक्त 500 रुपयांच्या नोटाच सुमारे 1.80 कोटी रुपये इतक्या होत्या. उर्वरित रक्कम 200 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये होती.
इतकी मोठी रक्कम असल्याने नोटा मोजण्यासाठी मशीन वापरण्यात आली. तसेच चांदीचे वजन करण्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून पेन ड्राइव्ह, मॉडेम, संगणक, लॅपटॉप असा डिजिटल पुरावाही जप्त करण्यात आला आहे.
advertisement
पाच आरोपी अटकेत, देशभरात जाळे पसरल्याचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी राहुल जैन (किदवई नगर), शिवम त्रिपाठी, सचिन गुप्ता (यशोदा नगर-गंगागंज), वंशराज आणि आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार हे पाचही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत.
तपासादरम्यान दिल्ली, अलीगढ, वाराणसी, इंदूर, मुंबई, नोएडा आणि जयपूर येथील काही लोकांची नावे समोर आली असून, या नेटवर्कचे धागेदोरे देशभर पसरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
घरात पैशांचा डोंगर, चांदीचा खच; मध्यरात्रीचा थरार, नोटा मोजताना मशीन तापली अन् पोलिसांचे हात दुखू लागले, चांदी गोळा करत कर्मचारी थकले
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement