MNS : राज ठाकरेंना मोठा झटका? निवडणुकीतील पराभवानंतर 'या' मनसे नेत्याचा राजीनामा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीनंतर मोठा झटका बसला आहे.कारण निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे मनसैनिकांमध्ये खळबळ माजली आहे.
Avinash Jadhav Resign : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीनंतर मोठा झटका बसला आहे.कारण निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे मनसैनिकांमध्ये खळबळ माजली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच 125 जागा लढल्या होत्या. पण या निवडणुकीत मनसेला खाते देखील उघडता आले नाही.राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला होता. या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत मनसेचे राजू पाटील हा आमदार तरी निवडून आला होता. मात्र यावेळेस राजू पाटील देखील पडले होते. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला होता.
advertisement
मनसे हा धक्का पचवत असतानाच आता त्यांना आणखीण एक धक्का बसला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी विधानसभा निवडणुकीची पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत अविनाश जाधव यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मात्र आता राज ठाकरे त्यांचा हा राजीनामा स्विकारतात का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS : राज ठाकरेंना मोठा झटका? निवडणुकीतील पराभवानंतर 'या' मनसे नेत्याचा राजीनामा


