3 वर्षांचं प्लॅनिंग, संधी मिळताच डाव साधला, कारसह तरुणाला जिवंत जाळलं, लातूर प्रकरणात मोठी अपडेट

Last Updated:

Latur Crime: लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात घडलेल्या एका जळीत कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गणेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने लिफ्ट मागणाऱ्या एका व्यक्तीला जाळून मारलं आहे.

News18
News18
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात घडलेल्या एका जळीत कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गणेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने लिफ्ट मागणाऱ्या एका व्यक्तीला जाळून मारलं आहे. आरोपीनं पीडित व्यक्तीला समोरील सीटवर बसवून संपूर्ण कार पेटवून दिली. यात संबंधित व्यक्तीचा कोळसा झाला. टर्म इन्सुरन्सच्या पैशांसाठी ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या गणेश चव्हाणला अटक केली आहे. याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील मोठा खुलासा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता. लातूर जिल्ह्याचा तो प्रमुख होता. त्याच्यावर ५७ कोटींचं कर्ज होतं. फ्लॅट विकत घेण्यासाठी त्याने हे कर्ज काढलं होतं. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने लिफ्ट मागणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला जीवंत जाळून मारलं आहे. यासाठी त्याने तीन वर्षे आधीच हे प्लॅनिंग केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
तीन वर्षापूर्वी त्याने एक कोटींचा विमा काढला होता. हीच रक्कम मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. या घटनेनंतर तो एका मैत्रिणीच्या संपर्कात होता. यावरून पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली आहे. जळीत कांडानंतर गणेशने त्याचे दोन सीम बंद केले होते. तिसऱ्या सीमवरून आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग केली. अवघ्या २४ तासांत पोलिसांच्या तो गळाला लागला.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

रविवारी रात्री उशिरा औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याचा कॉल डायल ११२ वर आला होता. तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. कारमध्ये आढळून आलेल्या हातातील कड्यावरून आणि कारच्या क्रमांकावरून गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला. कुटुंबीयांनी यावरून कारमध्ये जळालेला सांगाडा हा गणेश चव्हाणचाच असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासाला गती दिली.
advertisement
कुटुंबीयांच्या सांगण्यावरून गणेश चव्हाण याच्याकडे असलेले दोन मोबाइल समोर आले. हे दोन्ही क्रमांक बंद आढळून आले. दरम्यान, त्याने अलीकडे सर्वाधिक कॉल कोणाला केले? याचा पोलिसांनी शोध घेतला. गणेश चव्हाण एका महिलेशी बोलत असल्याचे समोर आले. यातूनच तो तिच्याशी चॅटिंग करत असल्याचे पोलिसांना समजले. मग गणेश चव्हाण तर कारमध्ये जळाला असेल तर चॅटिंग कोण करत आहे? या प्रश्नाने पोलिसांना भंडावून सोडले. मग पोलिसांनी त्याच्या तिसऱ्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला. तो रात्री कोल्हापूरमध्ये असल्याचे समोर आले. पुन्हा काही तासांनी तो तळकोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करत त्याला विजयदुर्ग येथे अटक केली. त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, गुन्ह्याचे बिंग फुटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
3 वर्षांचं प्लॅनिंग, संधी मिळताच डाव साधला, कारसह तरुणाला जिवंत जाळलं, लातूर प्रकरणात मोठी अपडेट
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement