BMC Election : मुंबई महापालिकेतून ठाकरे गटाला हटवण्यासाठी भाजप-संघाचा मेगा प्लॅन तयार, बैठकीत नक्की काय ठरलं?

Last Updated:

BJP RSS Plan for BMC Election : भाजपच्या मिशन मुंबईची तयारी सुरू झाली असून महत्त्वाचे पदाधिकारी आणि संघाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मेगाप्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीएमसीतून ठाकरे गटाला हटवण्यासाठी भाजप-संघाचा मेगा प्लॅन तयार, बैठकीत नक्की काय ठरलं?
बीएमसीतून ठाकरे गटाला हटवण्यासाठी भाजप-संघाचा मेगा प्लॅन तयार, बैठकीत नक्की काय ठरलं?
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाला शेवटा धक्का देण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या मिशन मुंबईची तयारी सुरू झाली असून महत्त्वाचे पदाधिकारी आणि संघाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मेगाप्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील विलेपार्ले येथे रविवारी मुंबई भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि संघाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मतदारांना साद घालण्यापासून आक्रमक प्रचाराबाबत रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

>> बैठकीत काय ठरलं?

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला लक्ष ठेवून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी संयुक्त रणनीती बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश देत निवडणूक मोहीम आक्रमकपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघाचे केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, तसेच मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक झाली.
advertisement

>> बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा, मेगा प्लॅन काय?

या बैठकीत लोकांशी संबंधित अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा आणि जनमानसात पोहोचवा असा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, महापालिका प्रशासनातील प्रलंबित मुद्दे आणि चालू प्रकल्पांची स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत नेण्यावर भर देण्याचे ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेने उतरण्याचे निर्देश देताना विकास आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना देण्यात आली आहे.
advertisement
नरेटिव्हच्या लढाईत दुर्लक्ष न करण्याचेही भाजप-संघाचे ठरले आहे. विरोधक निर्माण करणार्‍या कथनांना त्वरित उत्तर देण्याचे, तसेच सोशल मीडिया आणि ग्राउंड कॅम्पेन दोन्हीवर समांतर काम करण्याचे निर्देश देण्यात आहे.
भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटासह युती असली तरी मुंबईत पक्ष स्वतंत्रपणे संघटित शक्ती दाखवणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक एकसंध शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला होता. तर, शिवसेनेला स
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : मुंबई महापालिकेतून ठाकरे गटाला हटवण्यासाठी भाजप-संघाचा मेगा प्लॅन तयार, बैठकीत नक्की काय ठरलं?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement