advertisement

...तर पिंपळगाव जळाल्याचा भास, माफी मागितली पण भाजप नेते लोणीकरांची मग्रुरी कायम

Last Updated:

Babanrao Lonikar: मी काहीही चुकीचे बोललो नाही. सरकारच्या फायदा घेऊन त्यांच्याच विरोधात समाज माध्यमांत लिहिणाऱ्यांबद्दल मी बोललो, अशी मग्रुरी माफी मागतानाही बबनराव लोणीकर यांनी दाखवली.

बबनराव लोणीकर
बबनराव लोणीकर
जालना : भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी समाज माध्यमांतून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांना सुनावताना वादग्रस्त वक्तव्य केले. तुमच्या बापाला पेरायला पैसे मोदी देतात, तुमच्या बायको बहिणीच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे देतात आणि तुम्ही त्यांच्यावरच टीका करता.. असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते लोणीकर यांनी केले. सर्वत्र टीकेनंतर लोणीकर यांनी अखेर माफी मागितली पण माफी मागतानाही त्यांची मग्रुरी कायम होती.
मी काहीही चुकीचे बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी कधीही शेतकऱ्यांच्याविरोधात बोलणार नाही. परंतु शासनावर टीका करणाऱ्यांच्या विरोधात मी बोललो, असे लोणीकर म्हणाले. माफी मागतानाही आपण काही चुकीचे बोललोच नाही, असा दावा करीत त्यांनी आपली मग्रुरी दाखवली.

माझे काहीही चुकले नाही, तरीही माफी मागतो

advertisement
शेतकऱ्यांच्याविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही. मी शेतकऱ्यांमुळेच आहे. मात्र राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन समाज माध्यांवर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्यांविरोधात मी बोललो. माझे काहीही चुकले नसतानाही मी एकदा नव्हे तर अनेक वेळा शेतकऱ्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले. तसेच पिंपळाचे पान जमिनीवर पडले तरी पिंपळगाव जळाल्याचा भास विरोधक निर्माण करतात, असेही लोणीकर म्हणाले.
advertisement

लोणीकर नेमके काय म्हणाले होते?

तुझ्या बापाला पेरणीला पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला आणि बायकोला लाडक्या बहिणीचा पैसे दिले, तुमच्या अंगावरचे कपडे, बूट आणि चपला आम्हीच दिल्या, असे असताना सरकारवर आणि आमच्यावर टीका कशासाठी करता? असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केले.

जगाच्या पोशिंद्याचा बाप काढणारे बबनराव लोणीकर विकृतीचा कळस- काँग्रेसकडून समाचार

advertisement
जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. माजी मंत्री, भाजप नेते बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर पिंपळगाव जळाल्याचा भास, माफी मागितली पण भाजप नेते लोणीकरांची मग्रुरी कायम
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement