छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, तब्बल 80 जण बंडखोरीच्या तयारीत; BJP कडून 'मिशन मनधरणी'

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पक्षात तब्बल 80 जणांनी बंडखोरी केल्याचं चित्र आहे. आता 80 बंडखोरांना थांबवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. 

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी देण्यावरून महायुतीमध्ये नाराजांची लाट आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपला याचा चांगलाच फटका बसला आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण इच्छुक उमेदवाराची संख्या जास्त असल्यामुळे तिकीट देण्यावरून वाद झाला आहे. आता भाजपमध्ये तब्बल ८० जणांनी बंडखोरी केल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी एकूण ४२ बहुसदस्यीय प्रभागात निवडणूक लढवली जात असून एकूण १२६ जागा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये ३ उमेदवार निवडणूक लढवत आहे. अशातच सत्ताधारी भाजपमध्ये बंडोबांनी डोकं वर काढलं आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पक्षात तब्बल 80 जणांनी बंडखोरी केल्याचं चित्र आहे. आता 80 बंडखोरांना थांबवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.
संभाजीनगरमध्ये सर्वाधिक बंडखोरी ही भाजपमध्ये झाली आहे. मागील दोन दिवसांपासून बंडखोरी थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.  आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांच्याकडून भेटीगाठी घेत बंडोबांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे.  बंडोबांना थांबवण्यासाठी भाजप चांगलीच कामाला लागली आहे. बंडखोरांच्या घरी जाऊन भेटी घेऊन मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहे. आता दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे, पण त्याआधी भाजपला बंडोबांना थंडोबा करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
advertisement
भाजप उमेदवारांची यादी
प्रभाग क्र.गटआरक्षणउमेदवाराचे नाव
SCयुवराज सुरेश वाकेकर
ST महिला ज्योती जयेश अभंग
OBC महिलासविता रामलला बकले
Open पुनमचंद सोनाजी बमणे
SC महिलापुष्पा उत्तमराव रोजतकर
OBCसागर मिठुराव पाले
Open महिला सुवर्णलता उल्हास पाटील
Open राजगौरव हरिदास वानखेड़े
SCअशोक दामोदर पारधे
OBC महिला वैशाली अनिल कुलकर्णी
Open महिलामंगल विनायक साळुंके
Open प्रमोद प्रल्हादराव राठोड
SC महिलासुरेखा वसंत वाहुळ
OBCरामेश्वर ज्ञानदेव खैरे
Open महिलारुक्मिणी मारुती ठोंबरे
Openकिरण सदाशिवराव पाटिल
ST विष्णू काकासाहेब गायकवाड
OBC महिलासुरेखा संपत डोळस
Open महिलामाधुरी भरत मोरे
Openशिवाजी दादाराव शेळके
SC संजय सुखदेव संसारे
OBC महिलावैशाली अनिल गायकवाड
Open महिलाअनिता प्रकाश वाघमारे
Open समीर प्रकाश राजुरकर
SC महिलासुनंदा बाळासाहेब कांबळे
OBC गजानन विनायकराव मनगटे
Open महिलासौ. दिपाली बापुराव मुळे
Openअनिल किसनराव पाथ्रीकर
SC राजेश सुखदेव गांगवे
OBC महिलाप्रतिभा गजानन हिवाळे
Open महिला वंदना विष्णू मुगाजी
Open सुनिल सुखलाल खंडागळे
ST महिलासुनंदा लक्ष्मण खंडागळे
OBCलक्ष्मण बापूराव मानकर
Open महिलामनिषा दिपक मुंडे
Openसंदिप लक्ष्मणराव नांगरे
१०SC महिलासुजाता सुभाष पवार
OBCसतिष विठ्ठलराव घुगे
Open महिलामनिषा प्रमोद वाघचौरे
Openमुकुंद दामोदरराव कुलकर्णी
११SC सिद्धार्थ लक्ष्मण वाहुळे
OBC महिलामाधुरी राजु घुगे
Open महिलादिपाली प्रल्हाद कुलकर्णी
Openराजु नामदेव शिंदे
१२ST महिलासुनिता कैलास गायकवाड
OBC कल्याण नामदेवराव दाभाडे
Open महिला लक्ष्मी रमेशराव पाटिल
Openराजेंद्र रामभाऊ जानराव
१३SC महिला संगीता प्रकाश जाधव
OBCविठ्ठल गोविंद साळवे
Open महिलाराजश्री किशोर जाधव
Openभाऊसाहेब गंगाधरराव जगताप
१४STसाहेबराव सोपानराव अंभोरे
Open महिलाकोमल किरण विंचू
Open भगवान संपतराव मनगटे
१५SCअमोल सुखदेव जाधव
OBC महिलाअनिता सुनिल बनकर
Open महिला शोभा लक्ष्मण मुंडे
Open संजय रामदास गोर्डे
१६ST महिलासविता पुंडलिकराव गायकवाड
OBC लक्ष्मण पुंडलिकराव मुंडे
Open महिलाछाया सुभाष घोरपडे
Openदिपक जयप्रकाश कुलकर्णी
१७SC महिलाजयश्री संदिप पवार
OBC रामदास ज्ञानदेव खैरे
Open महिलासरोज प्रल्हाद पाटिल
Openविकास सुखदेवराव जैन
१८SC विकास कडुबा गांगवे
OBC महिलाकमल कडुबा घोरपडे
Open महिला भाग्यश्री मुकुंद पाठक
Open राजु संपतराव शिंदे
२४SC राजेश भगवान पवार
OBC महिलाकमल रामचंद्र नरोटे
Open महिला मुक्ता किसन ठुबे
Open सुनिल देविदास जगताप
२५SC मनोज बन्सीलाल गांगवे
ओबीसी महिलासविता भगवान घडमोडे
Open महिला प्रियंका दिपक खोतकर
Open रवि कावडे
२६SC महिलाअनिता मोहनलाल साळवे
OBCराजपुत पद्मसिंग काशीनाथ
Open महिला सवीता रत्नाकर कुलकर्णी
Open आप्पासाहेब विनायकराव हिवाळे
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, तब्बल 80 जण बंडखोरीच्या तयारीत; BJP कडून 'मिशन मनधरणी'
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement