उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात धक्का, अनिल कोकीळ शिंदेसेनेत, AB फॉर्म मिळवला, लागबागच्या लढाईकडे मुंबईचे लक्ष
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Anil Kokil Joi Eknath Shinde Shiv Sena : अनिल कोकीळ यांनी शेवटच्या क्षणी पक्षांतर केल्याने आणि त्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारीही मिळाल्याने यंदा लालबागमधील लढाई अतिशय निकराची होणार आहे.
मुंबई: शिवसेनेच्या जन्मापासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेल्या लालबाग परळमध्ये यंदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी मंगळवारी दुपारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांना लगोलग एबी फॉर्मही मिळाला. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते त्यांना एबी फॉर्म देण्यात आला.
प्रभाग क्रमांक २०४ मध्ये अनिल कोकीळ यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिल्याने कोकीळ झाले होते. प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांनी उमेदवारी मागितली होती. सुरुवातीच्या त्यांच्या नावाची चर्चाही झाली. परंतु ऐनवेळी कोकीळ यांच्या नावावर फुली मारून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली.
लालबागमध्ये तगडी लढत, तावडे विरुद्ध कोकीळ यांच्यात फाईट!
advertisement
अनिल कोकीळ यांनी शेवटच्या क्षणी पक्षांतर केल्याने आणि त्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारीही मिळाल्याने यंदा लालबागमधील लढाई अतिशय निकराची होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून किरण तावडे विरुद्ध शिंदेसेनेकडून अनिल कोकीळ यांच्यात तगडी लढत होईल. मुंबईतील ही लढत लक्षवेळी लढतींपैकी एक असेल. लालबाग हा परिसर मराठी बहुल आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पक्षाचे तिकीट असेल तर उमेदवार जिंकून येतोच असा येथील अनुभव आहे. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर ताकद विभागली गेली आहे. पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाल्याने शिंदसेनेत प्रवेश केल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
advertisement
तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब कसे झाले?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत उमेदवारीसाठी अटीतटीचा सामना पहायला मिळाला. मातोश्रीवरून अगदी दुपारनंतर शेवटच्या मिनिटाला प्रभाग क्रमांक २०४ मधून किरण तावडे यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यात आला. कोकीळ यांनी बंडखोरी करू नये, यासाठी अगदी शेवटच्या क्षणाला ठाकरेंनी तावडेंना एबी फॉर्म दिला. परंतु मनात शंका असल्याने कोकीळ यांनी पुढची तयारी केली होती.
advertisement
श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शाखाप्रमुख विजय इंदुलकर भरणार अपक्ष अर्ज
श्रद्धा जाधव यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक २०२ मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर अपक्ष अर्ज भरणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच मातोश्रीवर शिवडीतल्या शिवसैनिकांनी श्रद्धा जाधव यांच्यावर आरोप केले होते. तसेच पक्षावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली होती. एकाच व्यक्तीला एकाच कुटुंबाला वर्षानुवर्ष पक्षाकडून तिकीट दिले जाते, त्यामुळे इतरांवर अन्याय होतो, अशा भावना स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात धक्का, अनिल कोकीळ शिंदेसेनेत, AB फॉर्म मिळवला, लागबागच्या लढाईकडे मुंबईचे लक्ष










