KDMC : मुंबईत बसून राज ठाकरेंनी डाव टाकला, कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीच्या मोहऱ्यांना मनसेचे AB फॉर्म!

Last Updated:

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नाराजीनाट्य पसरलं आहे, याचाच फायदा घेत राज ठाकरेंच्या मनसेने थेट महायुतीच्या नेत्यांनाच एबी फॉर्म दिले आहेत.

मुंबईत बसून राज ठाकरेंनी डाव टाकला, कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीच्या मोहऱ्यांना मनसेचे AB फॉर्म!
मुंबईत बसून राज ठाकरेंनी डाव टाकला, कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीच्या मोहऱ्यांना मनसेचे AB फॉर्म!
कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे, पण सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये अर्ज न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे, पण अर्ज भरून झाले तरी महायुतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढत आहे? याबाबतचा गोंधळ अजूनही कायम आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नसल्याची चर्चा आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 जागा आहेत. महायुतीमध्ये एबी फॉर्म वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी पसरली आहे. महायुतीचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते एबी फॉर्म न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. अशातच काही इच्छुकांनी थेट मनसेकडून एबी फॉर्म आणत उमेदवारी अर्ज भरले आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्यामुळे एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बंडखोरी शमवण्यासाठी पक्षातील वरिष्ठांची कसोटी लागणार आहे.
advertisement
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उद्या म्हणजेच 31 डिसेंबर 2025 ला अर्जांची छाननी होणार आहे, त्यानंतर 2 जानेवारीला उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीला नाराजांची बंडखोरी थंड करायला पुढचे 3 दिवस मिळणार आहेत. या नाराजांचं बंड शमवण्यात यश आलं नाही तर महायुतीची डोकेदुखी वाढू शकते.

भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेला जास्त जागा दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला आणि निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली, यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष जे स्वत: डोंबिवलीचे आमदार आहेत, त्यांनी तातडीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : मुंबईत बसून राज ठाकरेंनी डाव टाकला, कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीच्या मोहऱ्यांना मनसेचे AB फॉर्म!
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement