अंधार होताच साधायचा डाव, नराधमाचं अल्पवयीन मुलीसोबत वारंवार घृणास्पद कृत्य, कांड वाचून हादराल!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ब्रह्मपुरी: चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सौंदरी गावात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर गावातील एका नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नराधम आरोपी हा गावातील लाईट गेल्यावर किंवा अंधार पडल्यावर पीडित मुलीला वासनेचा शिकार बनवायचा. पीडित अल्पवयीन मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याने तिच्यासोबत घडणारा प्रकार ती कुणालाच सांगत नव्हती. अखेर शाळेतील शिक्षिकेनं तिला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. नरेश उर्फ नरेंद्र ठोंबरे (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबाने भीतीपोटी तक्रार केली नव्हती, मात्र शाळेच्या शिक्षिकेच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी वडसा येथील एका शाळेत शिकते. वीज गेल्यावर किंवा अंधार झाल्यावर ती वारंवार घाबरून बडबड करत असे. तिच्या या वागणुकीतील बदल शाळेच्या शिक्षिकेच्या लक्षात आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. आरोपी नरेश ठोंबरे हा मजुरी करतो. गावात असताना तो या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शौचालयात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
ही माहिती मिळाल्यानंतर शिक्षिकेने तात्काळ विद्यार्थिनीच्या आई-वडिलांना भेटून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा आग्रह केला. मात्र, आरोपीच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तक्रार करण्यास नकार दिला. यानंतर शिक्षिकेने स्वतःच पुढाकार घेत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलिसांनी आरोपी नरेश ठोंबरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एम), ६४, (२) (एम) के. ६५ (१) व्ही.एन. एस. पोस्को तसेच दिव्यांग अधिनियम २०१६ अंतर्गत ९२ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला रविवार (दि. १७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, शिक्षिकेच्या धाडसी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 15, 2025 8:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंधार होताच साधायचा डाव, नराधमाचं अल्पवयीन मुलीसोबत वारंवार घृणास्पद कृत्य, कांड वाचून हादराल!