Breast Cancer: महिलांनो... ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुरुष असो किंवा महिला सर्वांमध्येच कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहेत पण विशेष करून महिलांमध्ये सध्याला स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामागे विविध अशी कारणे आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुरुष असो किंवा महिला सर्वांमध्येच कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहेत पण विशेष करून महिलांमध्ये सध्याला स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामागे विविध अशी कारणे आहे. या मागील नेमकी काय कारणे आहेत किंवा यावरती महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयीच आपल्याला माहिती सांगितलेली आहे डॉक्टर अनघा वरुडकर यांनी...
सध्या पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलेले दिसत आहे. विशेष करून महिलांमध्ये. पाच पैकी एका महिलेला हा कर्करोग होतो. भारतापेक्षा इतर देशांमध्ये देखील या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे पण त्या ठिकाणी कर्करोग बऱ्या होण्याचे प्रमाण हे जास्त आहे कारण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. आपल्याकडे जर आपण अशा पद्धतीने जनजागृती केली तर नक्कीच आपल्याकडे देखील या कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.
advertisement
स्तनांचा कर्करोग होण्याची विविध अशी कारणे आहेत यापैकी म्हणजेच की आपली बदलती जीवनशैली त्यासोबतच कुठल्याही प्रकारचे व्यसन असणे त्यानंतर आहार मोठ्या प्रमाणामध्ये आपण फास्ट फूड किंवा पॅकिंग पुढे खातो त्यासोबतच राजोनिवृत्ती देखील महिलांमध्ये मोठे प्रमाण वाढत असते. सर्व महिलांनी आपल्या स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे त्यानंतर 40 नंतर सर्व महिलांनी आपल्या सर्व प्रकारच्या टेस्ट या करून गेल्यावर त्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची गाठ दिसली तर ती तुम्ही तरी डॉक्टरांकडे जाऊन दाखवा. किंवा काहीतरी दुखलं तरी डॉक्टरांकडे जाऊन संपर्क करावा जेणेकरून निदान होईल. त्यावर घ्यावयाची काळजी म्हणजे आपण आपली जीवनशैली सुधारावी त्यानंतर दररोज व्यायाम करावा आहार व्यवस्थित घ्यावा या सर्व जर गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आपल्याकडे देखील याचे प्रमाण कमी होईल असं डॉक्टर अनघा वरुडकर यांनी सांगितले आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Nov 07, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Breast Cancer: महिलांनो... ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही करू नका दुर्लक्ष





