साखरपुडा झाला, तरुणीसह घरी येत होतं कुटुंब, घाटात तिघांकडून तलवारीने हल्ला, नियोजित वधूला पळवलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं वेरुळच्या घाटातून कारने प्रवास करणाऱ्या कुटुंबासोबत भयंकर प्रकार घडला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं वेरुळच्या घाटातून कारने प्रवास करणाऱ्या कुटुंबासोबत भयंकर प्रकार घडला आहे. तीन अज्ञातांनी कुटुंबीयांची कार अडवून कुटुंबावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. तसेच कारमधील तरुणीचं अपहरण केलं. तिला जबरदस्तीने गाडीत बसवून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात कारचालकासह चार वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणीचं हल्लेखोरांनी अपहरण केलं. तिचं नुकतंच लग्न ठरलं होतं. रविवारी १३ जुलै रोजी तिचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून हे कुटुंब पुन्हा आपल्या गावी परत चाललं होतं. पण वाटेत असणाऱ्या वेरुळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ तीन अज्ञातांनी या कुटुंबीयांची कार अडवली आणि कुटुंबावर हल्ला करत नियोजित वधूचं अपहरण केलं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी उपनगरातील एक कुटुंब आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी रविवारी छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरात गेले होते. दुपारी साखरपुडा पार पडल्यावर विवाह ठरवलेल्या वधूसह हे कुटुंब रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. दरम्यान, रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ अज्ञात तिघांनी त्यांच्या वाहनास (एमएच १८ बीआर २५१८) अडवून तलवार व कोयत्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून चारवर्षीय पीयूष पाटील याला गंभीर जखमी केले. तर चालक कैलास श्रीकृष्ण शिंदे (रा. मोहाडी) देखील जखमी झाला. या वाहनात चार महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले.
advertisement
या घटनेनंतर संबंधित वाहन खुलताबाद पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले असून अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. हल्लेखोरांचा उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, जुनी दुश्मनी की आणखी काही कारण यामागे आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र एका तरुणीचं अशाप्रकारे घाटातून अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 15, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साखरपुडा झाला, तरुणीसह घरी येत होतं कुटुंब, घाटात तिघांकडून तलवारीने हल्ला, नियोजित वधूला पळवलं