बहिणीचं स्वप्न भावाने पूर्ण केलं, भावाचं प्रोफेशनल पाहून सर्वच थक्क झाले...

Last Updated:

सामान्य घरातून जन्मलेला विजय छोटीशी नोकरी करत आपल जीवन जगत होता. त्याला लहानपणापासून मेहंदी, रांगोळी, चित्रकलेची आवड होती. पण त्या आवडीला प्रोत्साहन देण्याइतपत परिस्थिती साथ देणारी नव्हती.

+
विजय

विजय गायकर मेकअप आर्टीस्ट डोंबिवली 

सामान्य घरातून जन्मलेला विजय छोटीशी नोकरी करत आपल जीवन जगत होता. त्याला लहानपणापासून मेहंदी, रांगोळी, चित्रकलेची आवड होती. पण त्या आवडीला प्रोत्साहन देण्याइतपत परिस्थिती साथ देणारी नव्हती. परंतु आईनंतर बहीण असते असे जिवंत उदाहरण विजयच्या आयुष्यात घडले. विवाहित बहिणीने विजयचे स्वप्न ओळखून त्या स्वप्नांना चालना दिली.
2018 मध्ये विजयने ब्युटी पार्लरचा क्लास जॉइन केला त्यात तो एकटाच मुलगा बाकी 40 सगळ्या मुली असल्याने या क्षेत्रात विजयची घालमेल उडाली. शेवटी बहिणीचं स्वप्न आहे म्हणून लोकं काय बोलतील समाज काय समजेल या सगळ्या गोष्टी इग्नोर करत पुढे जात राहिला. सुरुवात अवघड गेली परंतु शेवट मात्र गोड झाला. साध्या कंपनीत काम करणाऱ्या विजयने एक बहिणीच स्वप्न आहे म्हणून क्लास जॉइन केला. परंतु ते आज त्याचं भविष्य उजळवणार ठरलं.
advertisement
एकदा इन्वेसमेंट केली पण आज तिच गुंतवणूक लाखाच्या घरात पोहोचली. दरवर्षी विजयकडून मेकअप आर्टीस्ट 30 ते 35 होऊन जातात. त्यामुळे विजय आजच्या तरुणांना उदाहरण ठरलं आहे. की मुले ही या क्षेत्रात उतरू शकतात. शहरी भागात मुले मेकअप आर्टीस्ट म्हणून दिसतात परंतु खेड्यात ही स्थिती  बघायला मिळतं नाही. विजयने हेच सिद्ध करून दाखवले की मुलगा म्हणून मेकअप आर्टीस्ट होऊ शकतो. सुरुवातीला लोकांची मेंटलेटी लोकांना उत्तर देणे हे सगळ अनुभवण्यापलीकडे असताना त्यातून मार्ग काढत विजय आज लाखो रुपये जरी कमवत असला तरी त्याची आवड पाहता या क्षेत्रात खंबीरपणे उभी राहिली त्याची बहिण.
advertisement
म्हणून आज जे स्वप्न आहे ते बहिणीच अस तो बोलतो.आणि आजच्या तरुणाईला ही इतर ठिकाणी नोकर म्हणून काम करण्यापेक्षा आपली आवड निवड ओळखून त्या क्षेत्रात मेहनत घ्या नोकर बनण्यापेक्षा मालक बना. हाच संदेश हा यशस्वी व्यावसायिक मेकअप आर्टीस्ट देत आहे.एकदा खर्च करा पण आयुष्यभर कमवा त्यामुळे एक चांगले व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा.असे विजय याने म्हटले आह
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बहिणीचं स्वप्न भावाने पूर्ण केलं, भावाचं प्रोफेशनल पाहून सर्वच थक्क झाले...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement