advertisement

क्षणात सगळं संपलं, बुलढाण्यात पोलिसाचा विहिरीत आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Buldhana News: बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव पंजाबराव शेळके असं आहे. ते बुलढाणा पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. पंजाबराव शेळके यांनी मेहकर तालुक्यातील बाबुलखेड येथील शेत शिवारात असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून, तो शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement

आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

पंजाबराव शेळके यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप समजू शकलं नाही. घटनास्थळावरून कोणतीही 'सुसाईड नोट' अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे अचानक आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, कामाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण, या सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
क्षणात सगळं संपलं, बुलढाण्यात पोलिसाचा विहिरीत आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement