Buldhana : भाजप नेते आणि माजी आमदाराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated:

विजयराज शिंदे हे अमरावती येथे खासदार भोंडे यांच्या भेटीसाठी निघाले होते. अकोल्यात समोरून येणाऱ्या बसने शिंदे यांच्या कारला धडक दिली.

News18
News18
राहुल खंडारे, बुलढाणा, 07 ऑक्टोबर : बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने विजयराज शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अपघातात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह सहकारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अकोल्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उफचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजयराज शिंदे हे अमरावती येथे खासदार भोंडे यांच्या भेटीसाठी निघाले होते. अकोल्यात समोरून येणाऱ्या बसने शिंदे यांच्या कारला धडक दिली. यानंतर कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कारला बस धडकताच एअरबॅग उघडल्याने जीवित हानी टळली. स्वतः शिंदे आणि त्यांचा कारचालक दोघेही जखमी झाले आहेत.
advertisement
विजयराज शिंदे यांच्या कारला ज्या बसने धडक दिली तो मोबाईलवर बोलत असल्याचं सांगण्यात येत आहे. कारचा अपघात होण्याआधी विजयराज शिंहे यांनी अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली होती. या भेटीनंतर खासदार भोंडे यांच्याकडे जात असताना दुपारी 12 वाजेदरम्यान हा अपघात घडला. दरम्यान शिंदे यांचे अनेक समर्थक अकोला कडे रवाना झाल्याचे कळते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : भाजप नेते आणि माजी आमदाराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement