Neelima Chavan : चिपळूणच्या नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे पडसाद बुलढाण्यात; सरकारला दिला मोठा इशारा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Neelima Chavan : रत्नागिरीत जिल्ह्यातील नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात बुलढाण्यात नाभिक समाजाने आंदोलन केलं.
राहुल खंडारे प्रतिनिधी
बुलढाणा, 7 ऑगस्ट : नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलं नाही. घटनेच्या सहा दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागले नाही. घटनास्थळी आणि आसपासरच्या परिसरात पोलिसांनी कसून तपासणी केली. नीलिमाचा मोबाईल, पर्स मिळालेले नसल्याने पोलिसांना तपाशाची दिशा सापडलेली नाही. तिचा व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, घटनेला आठवडा होत आला तरी काहीच मिळाले नसल्याने लोक संतप्त होत आहेत. या घटनेचे पडसाद आज बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळाले.
advertisement
नीलिमा चव्हाण मृत्यूचं बुलढाण्यात पडसाद
बुलढाणा जिल्ह्यात नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात ओमळी येथे स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय नीलिमा चव्हाणच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर शासन करा अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यात नाभिक समाज संघटने कडून करण्यात आली आहे. यावेळी या युवतीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास नाभिक समाज रस्त्यावरची लढाई लढणार असून होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा नाभिक समाज संघटने कडून देण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास
रत्नागिरी जिल्ह्यात नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे, या मृत्यू प्रकरणाला 6 दिवस होऊन गेले. मात्र, आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दापोलीत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण सलग दोन दिवस सुट्टी आल्याने चिपळूण येथील घरी निघाली होती. खेड येथे चिपळूण बसमध्ये बसली. मात्र, ती घरी पोहचली नाही, तिचे शेवटचे लोकेशन खेड कोंडिवली अढळून आले, तिच्या नातेवाईकांनी चिपळूण पोलिसांना मदत मागितली होती. परंतु, कोंडिवली गाव खेड तालुका हद्दीत येत असल्याने पोलिसांनी खेड पोलिसांकडे मदत मागण्यासाठी सांगितले. परंतु, खेड, चिपळूण पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे तिचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
advertisement
नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी गायब झाली होती तिचा मृतदेह 1 ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत आढळला होता. परंतु, मृतदेहाच्या डोक्यावरील केस नसल्याने तिचा खून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणाचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले होते.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
August 07, 2023 7:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Neelima Chavan : चिपळूणच्या नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे पडसाद बुलढाण्यात; सरकारला दिला मोठा इशारा


