गणपती मिरवणुकीवेळी वीजेचा शॉक, बुलढाण्याच्या विद्यार्थ्याचा ओडिशात मृत्यू; VIDEO VIRAL

Last Updated:

ओडिशातील कटक शहरात मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी वीजेचा शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18
News18
राहुल खंडारे, बुलढाणा, 20 सप्टेंबर : ओडिशातील कटक शहरात मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी वीजेचा शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमधून गणपतीची मिरवणूक सुरू असताना ही घटना घडली.  मृत्यू झालेला विद्यार्थी बुलढाण्यातील असून सोहम सावळे असं त्याचं नाव आहे. कटक शहरात एमएससीचे शिक्षण तो घेत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओडिसातील महाविद्यालयात गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कऱण्यासाठी आणली जात होती. गणपतीची वाजत गाजत मिरवणूक ट्रॅक्टरमधून काढत होते. तेव्हा मिरवणुकीत ट्रॅक्टरमध्ये उभा राहून तरुण झेंडा फिरवत होता. झेंड्याला असलेली एल्युमिनिअमची काठी ११ केव्हीच्या वीजेच्या तारांना लागली आणि ट्रॅक्टरमधील चार ते पाच जणांना वीजेचा जोरदार झटका बसला.
advertisement
ट्रॅक्टरवर उभा असताना जोरदार वीजेचा धक्का बसताच तरुण विद्यार्थी खाली कोसळले. यात सोहम सावळे याचा जागीच मृत्यू झाला. सोहमच्या मृत्यूने बुलढाणा जिल्ह्यातली त्याच्या गावी शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला असून त्यात क्षणात वीजेचा धक्का बसल्यानंतर तरुण खाली कोसळत असल्याचे दिसते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
गणपती मिरवणुकीवेळी वीजेचा शॉक, बुलढाण्याच्या विद्यार्थ्याचा ओडिशात मृत्यू; VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement