मोठी बातमी! खंडणी प्रकरणात मनसे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : बुलढाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणी मागितल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याला दोन लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याला दोन लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणात चिखली येथील गोविंद अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उप जिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याचा आरोप या मनसे पदाधिकाऱ्यांवर आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष आणि मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष यांचा समावेश आहे. दरम्यान मनसेने मात्र दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर आक्षेप घेतला आहे.चुकीच्या पद्धतीनं ही कारवाई झाल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
January 31, 2024 12:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
मोठी बातमी! खंडणी प्रकरणात मनसे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल


