Breaking news : बुलढाण्यात एसटीचा भीषण अपघात; बस घाटात कोसळली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे.
बुलढाणा, 6 ऑक्टोबर, राहुल खंडारे : एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 13 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. छत्रपती संभाजीनगर -मलकापूर एसटी बसचा अपघात झाला आहे. मर्दळी घाटात बस उलटून हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मर्दळी घाटात छत्रपती संभाजीनगर -मलकापूर बसचा भीषण अपघात झाला आहे. बस घाटात उलटली. या अपघातामध्ये तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जखमींपैकी चार जाणांना बुलढाणा रुग्णालयात तर नऊ जणांना धाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यु टर्न घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस घाटात पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
वाहनाचं मोठं नुकसान
दरम्यान या अपघातामध्ये बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. बस घाटात कोसळल्यामुळे बसचा एक भाग डॅमेज झाला आहे. सुदैवान या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, जखमींवर उपचार सुरू आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
October 06, 2023 8:54 AM IST


