दारू सोडवण्यासाठी भोंदू बाबाकडून विचित्र उपचार; व्यक्तीसोबत केलं असं कांड की अख्खं बुलढाणा हादरलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
दारू सोडवण्यासाठी उपचार म्हणून या व्यक्तीला या भोंदू बाबाकडून बेदम अशी मारहाण केली गेली.
बुलढाणा (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका भोंदू बाबाकडून दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. भोंदूबाबाने लाथाबुक्क्यांनी या व्यक्तीला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळील धारेश्वर आश्रमातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.
दारू सोडवण्यासाठी उपचार म्हणून या व्यक्तीला या भोंदू बाबाकडून बेदम अशी मारहाण केली गेली. त्यामुळे अशा पद्धतीने मारहाण करून उपचार केल्याने दारूचे व्यसन सुटते का ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे या भोंदू बाबावर वेळीच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
तर रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या घटनेचा ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दाखला देत म्हटलं, की ज्या व्यक्तीस मारहाण झाली ती व्यक्ती जर तक्रार देण्यासाठी समोर आली तर या भोंदू बाबा वर कारवाई केली जाईल.. त्यामुळे रायपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी या भोंदू बाबाकडून एखादं दुष्कर्म घडण्याची वाट पाहत आहे का ? असादेखील सवाल केला जात आहे.
advertisement
जादूटोण्याच्या संशयातून हत्या -
view commentsकाही दिवसांपूर्वी समोर आलेल्या दुसऱ्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये 14 वर्षांपूर्वी झालेला आपल्या मुलाचा मृत्यू हा चुलत भावाने केलेल्या जादूटोण्यामुळेच झाला या संशयातून एका माणसाने आपल्या दिव्यांग चुलत भावाचा जीव घेतला आहे. भदोहीमध्ये एका माणसाने आपल्या दिव्यांग चुलत भावाला जबर मारहाण करुन त्याचा जीव घेतला. या माणसाच्या मुलाचा 14 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत्यूचं कारण चुलत भावाने केलेला जादूटोणा हेच आहे, अशा संशयातून त्याने हे कृत्य केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2024 12:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
दारू सोडवण्यासाठी भोंदू बाबाकडून विचित्र उपचार; व्यक्तीसोबत केलं असं कांड की अख्खं बुलढाणा हादरलं


