Buldhana : 'घर द्या नाहीतर बायको, पण काहीतरी द्या', तरुणाचा सरकारकडे अजब प्रस्ताव
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने निवेदनातून केली आहे.
राहुल खंडारे, बुलढाणा, 06 ऑक्टोबर : घर नसल्याने कुणी मुलगी देत नाही. घर बांधायला घरकुल मंजूर झालेय. पण यादीत ३५ वे नाव आहे आणि पाच वर्षाच फक्त पाच घरकुल बांधली गेली आहेत. त्यामुळे मला घरकुल मिळेपर्यंत मी म्हातारा होईल असं म्हणत एका ३० वर्षांच्या तरुणाने पंचायत समितीकडे अजब अशी मागणी केलीय. घरकुल तरी बांधून द्या नाहीतर बायको द्या असं निवेदनच प्रशासनाला दिलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरकुल यादीत नाव असूनही घरकुलाचे बांधकाम गावात होत नाहीय. घर नाही त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोद्री येथील अंकुश नत्थुजी कड या 30 वर्षीय युवकाने एक अजब मागणी शासनाकडे निवेदन देऊन केली आहे.
या तरुणाने पंचायत समिती संग्रामपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केलेल्या या अजब" मागणीची चर्चा सध्या संग्रामपूर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
advertisement
घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने निवेदनातून केली आहे. अंकुशच्या या म्हटल्याप्रमाणे त्याचे नाव घरकुलाच्या यादीमध्ये ३५ व्या क्रमांकावर आहे. गेल्या ५ वर्षात घरकुल योजनेतून गावात फक्त ५ घरकुलांचे बांधकामच करण्यात आले आहे. त्यामुळे माझा ३५ वा नंबर येईपर्यंत मी तर पूर्ण म्हातारा झालो असेन. मग मला बायको कशी मिळणार ? असा सवाल अंकुशने पंचायत समिती संग्रामपूरचे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी पायघन यांना निवेदनातून केला आहे.
advertisement
घरकुल योजनेची कामे ज्या गतीने होत आहेत, त्या गतीने ३५ वा नंबर यायला अजून ३०-३५ वर्षे लागतील. तोपर्यंत माझी साठी ओलांडली असेल. एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशी मागणी अंकुशने निवेदनातून केली आहे. अंकुशच्या या अजब मागणीची चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे..
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2023 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : 'घर द्या नाहीतर बायको, पण काहीतरी द्या', तरुणाचा सरकारकडे अजब प्रस्ताव


