Maratha Reservation : बुलडाण्यात पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, तरुणाचा इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Buldhana : मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होताच एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच आत्महत्या करणाऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
राहुल खंडारे, बुलडाणा, 13 सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यात राज्यातील पहिला मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी आणि जालन्यात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा ची हाक देण्यात आली. दरम्यान, मोर्चाला सुरुवात होताच एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच आत्महत्या करणाऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
सात वर्षांपूर्वी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा नंतर पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची हाक बुलढाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा म्हणत एकत्र आले आहेत. यावेळी एका तरुणाने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी उडी मारणाऱ्याला वेळीच पकडले. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत मराठ्यांना स्वतंत्र असं आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व मागील मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच मराठा युवतींनी केला आहे. मराठा युवतींच्या एका शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तर मराठा समाजाला स्वतंत्र टीकणार असं आरक्षण देण्याची मागणीही या सकल मराठा समाजाच्या युवतींकडून करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2023 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Maratha Reservation : बुलडाण्यात पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, तरुणाचा इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न


