advertisement

Raksha Bandhan 2024: महाराष्ट्रातल्या या गावात कधीच साजरा होत नाही रक्षाबंधन; ग्रामस्थ वाहतात श्रद्धांजली!

Last Updated:

महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही, बहिण आपल्या भावाला राखी बांधत नाही.

News18
News18
बुलढाणा, राहुल खंडारे प्रतिनिधी : आज देशभरात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींचे पवित्र नाते अतूट करणारा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मात्र बुलढाण्यातील एका गावात बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. शिवाय रक्षाबंधन हा सण साजराही केला जात नाही. बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड या गावात ही अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जात आहे.
14 व्या शतकात मुघलांकडून पालीवाल समाजाचे मूळ असलेल्या राजस्थान येथील पाली गावावर आक्रमण करण्यात आले होते, त्यामध्ये असंख्य पालीवाल समाज बांधव हकनाक मारले गेले होते.  त्यामध्ये असंख्य महिला विधवा झाल्या होत्या, अनेक बहिणी आपल्या भावाला मुकल्या होत्या. त्याचाच निषेध म्हणून पालीवाल समाजाकडून रक्षाबंधन हा सण गेल्या शेकडो वर्षांपासून साजरा केला जात नाही. त्याऐवजी पालीवाल समाज एकता दिवस साजरा करून आपल्या पूर्वजांना दरवर्षी श्रद्धांजली वाहत असतो. संपूर्ण भारतभरात पालीवाल समाजाकडून रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही.
advertisement
दरम्यान दुसरीकडे आज देशभरात रक्षाबंधनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बहीण आपल्या लाडक्या भावांना राखी बांधत आहेत. नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आज सर्वत्र रक्षाबंधनाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Raksha Bandhan 2024: महाराष्ट्रातल्या या गावात कधीच साजरा होत नाही रक्षाबंधन; ग्रामस्थ वाहतात श्रद्धांजली!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement