'स्वाभिमानी'मध्ये राहुनच शेतकऱ्यांची सेवा करणार; अखेर तुपकरांची भूमिका समोर!

Last Updated:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. अखेर आज तुपकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

News18
News18
बुलढाणा, 8 ऑगस्ट, राहुल खंडारे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत तुपकर यांनी घेतलेल्या भूमिकांमधून देखील ही नाराजी समोर आली आहे. पक्षाच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या शिस्तपालन समितीच्या नोटीसला देखील तुपकर यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले तुपकर? 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पुण्यात शिस्तपालन समितीची बैठक होत आहे. मात्र या बैठकीला रविकांत तुपकर जाणार नाहीत. रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामधूनच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिस्तपालन समितीची नोटीस येण्यापूर्वीच आपण वरिष्ठांना आपल्याला असलेल्या आक्षेपांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे शिस्तपालन समितीच्या बैठकीला हजर राहणार नाही, अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. मी जरी या बैठकीला उपस्थित राहणार नसलो तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहुनच शेतकऱ्यांसाठी काम करेल असं तुपकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
राजु शेट्टींची प्रतिक्रिया  
दरम्यान रविकांत तुपकर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्ट यांनी म्हटलं की, तुपकर यांना संघटनेनं संगळं दिलं आहे. त्यांचे संघटनेबाबत जे काही आक्षेप असतील ते त्यांनी मांडावेत. त्यांची जी अडचण आहे, त्यावर आजच्या बैठकीत निर्णय होईल. शिस्तपालन समिती जे सांगेल त्यानुसार निर्णय होईल. तुपकर यांची माझ्याविरोधातच तक्रार आहे. त्यांचा जो आक्षेप आहे, तो त्यांनी शिस्तपालन समितीला सांगितला पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
'स्वाभिमानी'मध्ये राहुनच शेतकऱ्यांची सेवा करणार; अखेर तुपकरांची भूमिका समोर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement