Buldhana News : बुलढाण्यात शिंदे गटाच्या जाग्यावर भाजपचा डोळा? विद्यमान खासदारांना पक्षातूनच मिळणार आव्हान?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana News : खासदारांचे रेकॉर्ड खराब असल्याचं सांगत शिंदे गटाच्या खासदारांना भाजप डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
बुलढाणा, 11 नोव्हेंबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा लढवण्याचं अप्रत्यक्षपणे जाहीर केलंय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारण मोठा भूकंप झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन टर्मपासून बुलढाणा लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांना शिंदे गटाकडून डच्चू दिला जातोय की काय? अशा शंका आमदार संजय गायकवाड यांच्या चिरंजीव कुणाल गायकवाड याने व्हायरल केलेल्या पोस्टमुळे निर्माण झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप शिंदे गटाला आहे त्या लोकसभेच्या जागा द्यायला तयार नाही. जर प्रतापराव जाधव यांचा सर्व्हे रिपोर्ट चुकीचा आला असेल तर त्या जागी आमदार संजय गायकवाड हे दंड थोपटून लोकसभेच्या रिंगणात उतरायला तयार असल्याचं स्वतः आमदार गायकवाड म्हणाले आहेत.
advertisement
एकीकडे लोकसभेच्या असलेल्या जागा शिंदे गटाला देण्यास भाजप तयार नाही, तर दुसरीकडे आपल्या जागा भाजपला देणार नाही अशी ठोक भूमिका शिंदे गटाकडून घेतली गेली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शह काटशहाच राजकारण पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणी बुलढाणा लोकसभेचा प्रतापगड सलग तीन टर्म शाबूत ठेवणारे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यांनी या प्रकरणावर मौन बाळगून आपला डाव राखून ठेवला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी लोकसभेत भाजप शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी द्यायला तयार नसेल तर शिंदे गटाकडून आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून शिंदे गटातीलच पदाधिकाऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट केलंय. शिंदे गटाच्या या खेळीमुळे पुन्हा एकदा भाजप बॅकफूटवर जाते का? ते आता पहावं लागेल.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
November 11, 2023 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : बुलढाण्यात शिंदे गटाच्या जाग्यावर भाजपचा डोळा? विद्यमान खासदारांना पक्षातूनच मिळणार आव्हान?


