संतापजनक! बुलढाण्यात गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे.
बुलढाणा, 7 नोव्हेंबर, राहुल खंडारे : बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. शिक्षकानेच विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्याविरोधात पोक्सोसह इतर कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
advertisement
फोटो व्हायरल करण्याची धमकी
आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने आठवीत शिकणाऱ्या एका मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
November 07, 2023 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
संतापजनक! बुलढाण्यात गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार


