...त्यामुळे अजितदादा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला आले नाहीत? मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

Last Updated:

आज बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत.

News18
News18
बुलढाणा, 3 सप्टेंबर, उदय तिमांडे : आज बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित का राहू शकले नाहीत? यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
   नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत गर्दी आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी मी इथे आज आलो आहे. आजचा 15 वा कार्यक्रम असून आजपर्यंत 1 कोटी 61 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे लेह लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या कार्यक्रमाला गेले आहेत. तर अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत असं काही नाही. आमच्यात फेविकॉलचा मजबूत जोड आहे. सरकारला कुठेही काही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जालन्यातील लाठीचार्जवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.  जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचं मला देखील दु: ख झालं आहे. मात्र त्याची कारणमीमांसा न करता आरोप करण्यात येत आहेत.  ज्यांनी मराठा समजाचा गळा घोटला तेच तिथे येऊन गेले. आंदोलनाच्या मागून दगड फेक कोण करतात हे पाहावं लागेल याची माहिती आमच्या कडे येत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
...त्यामुळे अजितदादा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला आले नाहीत? मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement