घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कायापालट होणार, कसा होणार विकास? वाचा सविस्तर

Last Updated:

वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसराला आधुनिक रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांना हिरवा कंदील मिळाला आहे. मंदिराजवळ 43 कोटी खर्चून चौपदरी बायपास रस्ता उभारला जाणार आहे.

४३ कोटींचा बायपास व भव्य सुविधा; घृष्णेश्वर मंदिर परिसर २५० कोटीत उजळणार
४३ कोटींचा बायपास व भव्य सुविधा; घृष्णेश्वर मंदिर परिसर २५० कोटीत उजळणार
छत्रपती संभाजीनगर: वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसराला आधुनिक रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांना हिरवा कंदील मिळाला आहे. मंदिराजवळ 43 कोटी खर्चून चौपदरी बायपास रस्ता उभारला जाणार असून, एकूण 250 कोटींचा विस्तृत विकास आराखडा आता मार्गी लागला असल्याचे उच्चाधिकारी समितीने सांगितले.
पुनर्रचित प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी मिळाल्यानंतर कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या 156 कोटींच्या प्रकल्पात वाढ करून 53 कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेशकुमार आणि सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी उपस्थित राहून ऑनलाईन बैठकीत प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व नियोजन अधिकारी भारत वायाळ हे स्थानिक पातळीवर उपस्थित होते.
advertisement
210 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चात अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. मंदिर परिसर बाहेरील प्रशासकीय इमारत, विस्तृत भक्तनिवास,दर्शन लाइन व फंक्शन हॉल, व्यावसायिक संकुल उद्यान, प्रशस्त पार्किंग, महावितरण, एमटीडीसी आणि जलप्राधिकरणाशी संबंधित सुधारणा, पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सुधारणा कामे 13 कोटी तसेच 43 कोटींच्या बायपास रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, ज्यामुळे दररोज येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
advertisement
2018 पासूनचा प्रकल्प,अखेर वेग आला?
2018 मध्ये कागदावर सुरू झालेला हा प्रकल्प अनेक कारणांमुळे विलंबला होता. मात्र जानेवारी 2025 पासून प्रत्यक्ष कामांना गती मिळाल्याने भाविक व स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कायापालट होणार, कसा होणार विकास? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement