नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आता भुजबळांची एन्ट्री, मुख्यमंत्री फडणवीसांची डोकेदुखी वाढली

Last Updated:

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत गिरीश महाजनांनी सूचक वक्तव्य केलेलं असतानाच छगन भुजबळांनी आपल्या शैलीत गिरीश महाजनांना टोला लगावला आहे.

News18
News18
नाशिक:  नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही या रेसमध्ये उतरले नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. नाशिकमध्ये आपलं सगळं असताना ध्वजारोहणासाठी गोंदिया किंवा धुळ्याला जाणं आपण टाळल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं आहे. 
नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं.. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानं गिरीश महाजनांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत गिरीश महाजनांनी सूचक वक्तव्य केलेलं असतानाच छगन भुजबळांनी आपल्या शैलीत गिरीश महाजनांना टोला लगावला आहे.
advertisement

छगन भुजबळ काय म्हणाले? 

स्वातंत्र्यदिनी गोंदियात ध्वजवंदनासाठी नकार देणाऱ्या भुजबळ यांनी आपण पंधरा वर्षांपासून नाशिकला ध्वजवंदन करीत असल्याचे सांगितले. आपल्याला धुळे येथे ध्वजवंदनाला जाण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू

 एकीकडे नाशिकचा हा तिढा कायम असतानाच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी ध्वजारोहण केलं. तर रायगडच्या महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी ध्वजारोहण केलं. 
advertisement
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.  अशातच नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत भुजबळांच्या एन्ट्रीमुळं ही रस्सीखेच आणखीनच वाढली आहे  आता रायगडपाठोपाठ नाशिकचं पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा काढण्याचं आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांसमोर
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आता भुजबळांची एन्ट्री, मुख्यमंत्री फडणवीसांची डोकेदुखी वाढली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement