Chhagan Bhujbal Net Worth : भ्रष्टाचाराच्या आरोपानं तुरुंगात, राजकारणात पुन्हा कमबॅक, छगन भुजबळांची संपत्ती किती?

Last Updated:

Chhagan Bhujbal Net Worth : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड आज होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास घडलेल्या भुजबळांची संपत्ती किती?

 Chhagan Bhujbal Net Worth :
Chhagan Bhujbal Net Worth :
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड आज होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रात आणि राज्यात 2014 मध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळातील महाराष्ट्र सदन आणि इतर भ्रष्टाचाराच्या आरोपात छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. 2019 मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. आता त्यांचा मंत्रि‍मंडळात समावेश होत असल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. छगन भुजबळ यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात संपत्तीबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप, स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.
advertisement

छगन भुजबळांच्या पत्नीच्या नावे संपत्ती...

2024 च्या निवडणूक शपथपत्रानुसार, छगन भुजबळ यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता 16 कोटी 53 लाख रुपये आहे. मीना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रुपयांची जंगम तर 86 लाख 21 हजार 572 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मीना भुजबळ यांच्या नावावर 21 लाख 10 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 32 लाख 76 हजार रुपयांचे 455 ग्रॅम सोने, 4 लाख 37 हजारांची 5,150 ग्रॅम चांदी तर 22 लाख 5 हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत. मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहन देखील आहे.
advertisement

छगन भुजबळांची संपत्ती किती?

निवडणूक शपथपत्रानुसार, छगन भुजबळ यांच्याकडे एकूण 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची मालमत्ता आहे. तर, भुजबळांवर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे. छगन भुजबळ यांच्या नावावर दोन शेतजमीन, दोन घरं असून त्यांनी 3 लाखांची रक्कम ही न्यायालयात अमानत म्हणून भरली आहे. छगन भुजबळांच्या नावावर एक ट्रॅक्टर असून 585 ग्रॅम सोनं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal Net Worth : भ्रष्टाचाराच्या आरोपानं तुरुंगात, राजकारणात पुन्हा कमबॅक, छगन भुजबळांची संपत्ती किती?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement