चलो दिल्ली... छ. संभाजीनगरहून दिवसाला 3 विमानसेवा, हैदराबादसाठी पुन्हा उड्डाण, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Sambhajinagar Delhi Flight: मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरहून राजधानी दिल्लीसाठी रोज 3 विमाने झेपावणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून राजधानी दिल्लीचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एक एअर इंडिया आणि एक इंडिगो अशा दररोज 2 विमानसेवा उपलब्ध आहेत. 26 ऑक्टोबरपासून एअर इंडिया कंपनीने दिल्लीसाठी दुपारी नवीन विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी आता 3 विमानसेवा उपलब्ध असतील. तसेच, इंडिगो कंपनीने हैदराबादसाठीही नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या वेळेत असेल.
विमान कंपन्यांचे 26 ऑक्टोबर ते 28 मार्च 2026 या काळात लागू होणारे हिवाळी सत्रातील वेळापत्रक निश्चित झाले. एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबुकस्वार म्हणाले, एअर इंडियाकडून दुपारच्या सत्रात दिल्लीसाठी एक जादा विमान सुरू होणार आहे. तर इंडिगोने पूर्वी रद्द केलेले दिवसातील दुसरे हैदराबाद विमान परत सुरू केले आहे. पण, दररोजऐवजी आठवड्यातून 3 दिवस आहे. दोन्ही हैदराबाद विमान सकाळच्या सत्रातच असेल. बंगळूर विमान संध्याकाळऐवजी सकाळी आहे. मुंबईसाठी एक सकाळी, तर एक रात्री विमान पूर्वीप्रमाणे दररोज सुरू असेल. हैदराबादसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू झाली आहे.
advertisement
दिल्ली विमानाचे वेळापत्रक असे असेल
एअर इंडिया : सकाळी 6 वा. दिल्लीहून उड्डाण, सकाळी 8 वा. शहरात दाखल. शहरातून सकाळी 8:40 वा. उड्डाण व 10:35 वा. दिल्लीत.
एअर इंडिया : दुपारी 2 वा. दिल्लीहून उड्डाण, दुपारी 3:50 वा. शहरात दाखल. शहरातून दु. 4:30 वा. उड्डाण व सायं. 6:20 वा. दिल्लीत.
advertisement
इंडिगो : सायं. 4.55 वा. दिल्लीहून उड्डाण, सायं. 6:45 वा. शहरात दाखल. शहरातून सायं. 7:15 वा. उड्डाण व रात्री 9:05 वा. दिल्लीत.
दिल्लीसाठी ही असतील 3 विमाने
एअर इंडियाचे सकाळचे दिल्ली विमान 164 आसनी असेल, ज्यात 8 बिझनेस क्लास, 24 प्रीमियम इकॉनॉमी आणि 132 इकॉनॉमी असेल. दुपारचे विमान 182 आसनी असेल, ज्यात 12 बिझनेस क्लास तर 170 इकॉनॉमी सीट्स असेल. इंडिगोच्या सर्व विमानांत इकॉनॉमी सीट्स असतील. ज्यात हैदराबाद व गोवा 78 आसने असतील, तर दिल्लीसाठी 176 व मुंबईसाठी 232 आसन असेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 07, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चलो दिल्ली... छ. संभाजीनगरहून दिवसाला 3 विमानसेवा, हैदराबादसाठी पुन्हा उड्डाण, पाहा वेळापत्रक