छत्रपती संभाजीनगरकरांसाठी Bad News, मुंबईसाठीची नवीन विमानसेवा रद्द
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायंकाळची विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच रद्द झालीय.
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर: गेल्या काही काळापासून छत्रपती संभाजीनगर ते मुंबई विमानसेवेचा प्रश्न रेंगाळत आहे. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरकरांना मुंबईला विमानानं जाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 31 ऑक्टोबरपासून इंडिगोकडून आठवड्यातून आणखी एकदा म्हणजे सायंकाळी विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र ही विमानसेवा रद्द करण्यात आली असून याबाबत नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
राजधानी मुंबईला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावरून सायंकाळी विमान सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत आहे. ही मागणी पूर्ण करत काहीच दिवसांपूर्वी 'इंडिगो'ने आगामी सहा महिन्यांसाठी मुंबईला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबत वेळापत्रकही जाहीर केले होते. परंतु, आता नव्याने वेळापत्रक जाहीर केले असून यातून ही विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, चिकलठाणा विमानतळावरून 'इंडिगो'च्या मुंबई, दिल्ली, हैदराबाबद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथून राजधानी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. येथून संपूर्ण मराठवाड्यातून प्रवासी मुंबईला जात असतात. हा ओघ पाहूनच 'इंडिगो'ने 'विंटर शेड्युल'ची घोषणा केली होती. परंतु, सेवा सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय बदलण्यात आला आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
October 17, 2023 9:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी Bad News, मुंबईसाठीची नवीन विमानसेवा रद्द