advertisement

ऐन सणासुदीचा काळ, साखर अन् चणा डाळचे भाव वाढले; छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी काय म्हणाले?, VIDEO

Last Updated:

ही भाववाढ नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाली, त्यासोबतच ही भाववाढ किती दिवस राहणार आहे, याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी निलेश सोमाणी याबाबत माहिती दिली.

+
फाईल

फाईल फोटो

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : चातुर्मास सुरू झाला की सर्व सणावारांना सुरुवात होते. सणवार म्हटले की, प्रत्येक गोष्टींचे म्हणजे डाळीचे, साखरेचे भाव हे वाढतात. यातच आता साखर आणि चणाडाळीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ही भाववाढ नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाली, त्यासोबतच ही भाववाढ किती दिवस राहणार आहे, याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी निलेश सोमाणी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या चणाडाळ आणि साखरेला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येत आहे. सणवारात पुरण करण्यासाठी आणि स्वयंपाकामध्ये इतरही गोष्टींमध्ये चणाडाळ मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येते. त्यामुळे मागणी जास्त असल्याने चणाडाळ आणि साखरेच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या चणा डाळीचे भाव हे क्विंटलमागे 900 ते 950 रुपयांनी वाढले आहेत. आधी चणाडाळ ही 68 ते 70 रुपये होती. पण आता हीच डाळ 85 ते 90 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
advertisement
सध्या साखरेलाही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आली आहे. 3 ते 4 पटीने साखरेची मागणी वाढली आहे. यामुळे साखरेच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साखरेच्या भावात 200 ते 250 रुपयांची भाववाढ झाली आहे. आधी साखरेचे दर प्रतिक्विंटल 3900 रुपये होते. आता 4100 ते 4150 या दराने विकली जात आहे.
advertisement
दरम्यान, येत्या काळात साखर आणि चणाडाळीला अजून जास्त प्रमाणात मागणी येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऐन सणासुदीचा काळ, साखर अन् चणा डाळचे भाव वाढले; छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी काय म्हणाले?, VIDEO
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement