advertisement

घरात 'लक्ष्मी' आल्याचा आनंद, पण 54 व्या दिवशी घडलं भंयकर, आईवडिलांच्या ‘त्या’ निर्णयानं सगळ्यांना रडवलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: जवळपास 45 मिनिटे डोळ्यांत अश्रू दाटलेले असताना ते काहीही न बोलता आपल्या लेकीकडे शांतपणे पाहत बसून होते.

घरात लक्ष्मी आल्यानं आनंद, पण 54 व्या दिवशी भंयकर घडलं, आईवडिलांच्या ‘त्या’ निर्णयानं सगळ्यांना रडवलं!
घरात लक्ष्मी आल्यानं आनंद, पण 54 व्या दिवशी भंयकर घडलं, आईवडिलांच्या ‘त्या’ निर्णयानं सगळ्यांना रडवलं!
छत्रपती संभाजीनगर: अवघ्या 54 दिवसांच्या चिमुकलीच्या निधनानंतर तिच्या आई-वडिलांनी घेतलेला निर्णय अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. मुलगी जन्माला आल्याने घोरपडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते; मात्र जन्मानंतर काही दिवसांतच तिला मेंदूज्वराचा गंभीर आजार झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, डॉक्टरांचे प्रयत्नही सुरूच होते; पण अखेर त्या चिमुकलीची जीवनज्योत मालवली.
अतोनात दुःखाचा सामना करत असतानाही कुटुंबाने धैर्य दाखवत आपल्या लेकीचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण करण्यात आली. मात्र, प्रक्रिया संपल्यानंतरही आई-वडील आपल्या दोन महिन्यांच्या बाळापासून दूर जाऊ शकत नव्हते. जवळपास 45 मिनिटे डोळ्यांत अश्रू दाटलेले असताना ते काहीही न बोलता आपल्या लेकीकडे शांतपणे पाहत बसून होते.
advertisement
घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात हे देहदान पार पडले. डॉ. स्वप्ना आंबेकर यांनी नातेवाइकांशी संवाद साधत सर्व औपचारिकता पूर्ण केली. त्यांनी सांगितले की, देहदानाच्या घटना नेहमी घडतात; परंतु एवढ्या लहान बालकाचे दान हे अत्यंत भावनिक आणि मन हेलावून टाकणारे होते. आई पूर्णपणे स्तब्ध होती, तर वडील भावनांनी व्याकूळ झाले होते.
या चिमुकलीचा देह आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगात आणला जाणार आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी या निर्णयाचे कौतुक करताना नमूद केले की, लहान मुलांबाबतचा भावनिक संबंध अतूट असतो. अशा परिस्थितीत देहदानाचा निर्णय घेणे हे मोठे धैर्य असून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घरात 'लक्ष्मी' आल्याचा आनंद, पण 54 व्या दिवशी घडलं भंयकर, आईवडिलांच्या ‘त्या’ निर्णयानं सगळ्यांना रडवलं!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement