advertisement

Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, 'रिपोर्ट'साठी हालचालींना मोठा वेग, काय काय घडलं?

Last Updated:

Santosh Deshmukh Murder Case : शासनाने शुक्रवारी काढलेल्या नवीन निर्णयानुसार व्यंकटेश भट यांच्या जागी आता सह सचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Beed Crime New Twist in Santosh Deshmukh Murder Case Movements For Action Taken Report
Beed Crime New Twist in Santosh Deshmukh Murder Case Movements For Action Taken Report
Santosh Deshmukh Movements For Action Taken Report : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता एक नवीन वळण मिळालं असून, या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (ATR) तयार करणाऱ्या समितीच्या रचनेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यापूर्वी 9 जानेवारी रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीत सह सचिव व्यंकटेश भट यांचा समावेश होता. मात्र, शासनाने शुक्रवारी काढलेल्या नवीन निर्णयानुसार भट यांच्या जागी आता सह सचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

बड्या अधिकाऱ्यांचा समावेश

उच्चस्तरीय समिती अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून, यामध्ये प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे, हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते, ज्यावर आता ही नवीन समिती आपले मत मांडणार आहे.
advertisement

दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी

समितीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ताहलियानी समितीने सुचवलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी करणे हे असेल. या प्रकरणातील दोषींवर नेमकी काय कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलली जावीत, याचा सविस्तर आराखडा ही समिती तयार करणार आहे. सुग्रीव धपाटे यांच्या नियुक्तीमुळे या प्रक्रियेला आता अधिक गती मिळण्याची शक्यता असून, गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
advertisement

'कृती अहवाल' मांडला जाण्याची दाट शक्यता

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीने तयार केलेला 'कृती अहवाल' येत्या विधिमंडळ अधिवेशनात मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले होते, त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सह सचिव स्तरावरील या बदलामुळे आता अहवालाच्या छाननीमध्ये नेमके काय नवीन मुद्दे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, 'रिपोर्ट'साठी हालचालींना मोठा वेग, काय काय घडलं?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement