advertisement

Upvas Recipe : महाशिवरात्रीला बनवा हेल्दी आणि टेस्टी उपवासाचा पराठा! फक्त 2 साहित्यात होतो तयार..

Last Updated:

Healthy and tasty upvas paratha recipe : उपवाला सर्वात प्रचलित पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे. पण नेहमी तेच तेच खाऊ आपल्याला कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपी आणि कमी साहित्यात बनते.

हेल्दी उपवास पराठा
हेल्दी उपवास पराठा
मुंबई : यंदा 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला महादेवांच्या पूजेसोबत लोक उपवासही करतात. उपवाला सर्वात प्रचलित पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे. पण नेहमी तेच तेच खाऊ आपल्याला कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपी आणि कमी साहित्यात बनते. हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही.
आज आपण पाहणारा आहोत, उपवासाचा पराठा. इंस्टाग्रामवर maileki_kitchen या अकाऊंटवरून महिलेने या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. हा पराठा बनवायला एकदम सोपा आहे. चला पाहूया, उपवासाच्या पराठ्याची रेसिपी.
उपवासाचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- उकडलेले बटाटे
- राजगिऱ्याचे पीठ
- मीठ
- तेल
- हिरव्या मिरच्या
- जिरे
उपवासाचा पराठा बनवण्याची कृती
- उपवासाचा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचाय. हा बटाटा किसून घ्या.
advertisement
- या पराठ्यासाठी आपल्याला ठेचादेखील लागेल. यासाठी हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ टाकून तेच वाटून घ्या.
- हा ठेचा उकडलेल्या बटाट्यांमध्ये टाका. यामध्ये राजगिऱ्याच्या पीठ घाला आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळून घ्या.
- कणिक मळताना गरज असल्यास थोडे थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित कणिक मळून घ्या.
- आता या कणकेतून एक छोटा गोळा घ्या आणि कोरड्या पिठात बुडवून त्याचा परत लाटून घ्या.
advertisement
- आता हा पराठा तव्यावर टाकून, दिनही बाजूंनी तूप लावून मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्या.



 










View this post on Instagram























 

A post shared by priya Dhawale (@maileki_kitchen)



advertisement
पाहिलंत, हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो. चवीला तर उत्तम लागतो. तर या महाशिवरात्रीला साबुदाणा खिचडी व्यतिरिक्त या खास पदार्थही नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Upvas Recipe : महाशिवरात्रीला बनवा हेल्दी आणि टेस्टी उपवासाचा पराठा! फक्त 2 साहित्यात होतो तयार..
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement