ST bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागला, दरवाढीनंतर छत्रपती संभाजीनगर ते पुणे तिकीट किती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
ST bus Fare Hike : एसटी बसच्या तिकीट दरांत 15 टक्क्यांची वाढ झालीये. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून पुणे, नागपूर आणि इतर शहरांत जाण्यासाठीचे नवे तिकीट दर जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटी बसला ओळखळे जाते. परंतु, आता सर्वसामान्यांची लाल परी खिशाला कात्री लावणार आहे. नुकतेच एसटी बसच्या तिकीट दरात जवळपास 15 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. 24 जानेवारीपासून हे नवे तिकीट दर लागू करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरकरांना देखील पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांत जाण्यासाठी जादा पैसे द्यावे लागतील.
“वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यांमुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षित असते. मात्र मागील काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे,” असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
advertisement
छत्रपती संभाजीनगर आगारामधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातून कोणत्या शहरात किती पैसे मोजावे लागणार आहेत? याबाबत जाणून घेऊ.
मार्ग... जुने दर नवीन दर
छत्रपती संभाजीनगर - पुणे 340 395
छत्रपती संभाजीनगर -अहिल्यानगर 165 190
छत्रपती संभाजीनगर - नागपूर 730 845
advertisement
छत्रपती संभाजीनगर - जालना 90 105
छत्रपती संभाजीनगर - नांदेड 420 485
छत्रपती संभाजीनगर - लातूर 410 485
छत्रपती संभाजीनगर - बीड 200 230
छत्रपती संभाजीनगर - सोलापूर. 490 555
छत्रपती संभाजीनगर - कोल्हापूर 925 1066
दरम्यान, एसटीच्या प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान 1 रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ लागणार असून सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 26, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ST bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागला, दरवाढीनंतर छत्रपती संभाजीनगर ते पुणे तिकीट किती?