कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! मुंबई-पुण्याचा प्रवास महागला, मोजावे लागणार इतके पैसे!

Last Updated:

ST Bus Ticket: राज्यात एसटी बसच्या तिकीट दरांत जवळपास 15 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. कोल्हापूरहून मुंबई, पुणे आणि इतर शहरांत जाण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार पाहुयात.

+
कोल्हापूरकरांच्या

कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! मुंबई-पुण्याचा प्रवास महागला, मोजावे लागणार इतके पैसे!

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे लालपरीतून प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार असून सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान 1रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे. इंधनाची वाढते तर सुट्ट्या वाढत्या किमती यामुळे भाढेवाड केल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच ही दरवाढ लागू झली आहे.
advertisement
एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली. कोल्हापूर ते पुण्याचा साधी एसटीचा प्रवास 53 रुपयांनी आणि कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील प्रवास हा 89 रुपयांनी महागला. भाडेवाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे. सरासरी 14.95 टक्के वाढ केली आहे. कोल्हापूर मध्यवर्ती स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी आणि बसेसची झालेली भाडेवाढ लोकल18 च्या माध्यमातून पाहू.
advertisement
कोल्हापूर आगारातील प्रमुख मार्गावरील एसटी बसचे नवीन दर
मार्ग                        जुना दर नवीन दर
कोल्हापूर-सांगली    70           81
कोल्हापूर-पंढरपूर    260          303
कोल्हापूर-सोलापूर   375          433
कोल्हापूर-इचलकरंजी 40        46
कोल्हापूर-गडहिंग्लज 90         102
कोल्हापूर-वठार       30           36
कोल्हापूर-सातारा    185          212
कोल्हापूर-कराड      105          122
advertisement
कोल्हापूर-पुणे          330          383
कोल्हापूर-मुंबई        565          654
कोल्हापूर-चंदगड    160          182
कोल्हापूर-कागल    25           31
कोल्हापूर-गगनबावडा 90       102
कोल्हापूर-राधानगरी 80          91
कोल्हापूर-गारगोटी 80           91
कोल्हापूर-मलकापूर 70           81
कोल्हापूर-कुरूंदवाड 80          91
एकीकडे राज्यशासनाने महिला सन्मान योजनेतून महिलांना 50 टक्के सवलत दिली होती. आता त्यांच्या तिकीटामध्येही 15 टक्के वाढ होणार आहे. यामुळे महिलांना आता 35 टक्के सवलत मिळणार अशी स्थिती आहे. एसटी महामंडळाने खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेतला म्हटला असला तरी नियमित एसटीने प्रवास करणारे या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. कोल्हापूर आगारातून सुटणाऱ्या बहुतांशी एसटी बसचे सध्याचे दर सम संख्येत होते. उदाहरणार्थ कोल्हापूर-सांगली 70, कोल्हापूर-पंढरपूर 260, इचलकरंजी 40, गडहिंग्लज 90 असे होते. आता दरात वाढ झाल्याने हेच दर कोल्हापूर-सांगली 81, कोल्हापूर-पंढरपूर 303, इचलकरंजी 46, गडहिंग्लज 102 झाले आहेत. यामुळे सुट्ट्या पैशावरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! मुंबई-पुण्याचा प्रवास महागला, मोजावे लागणार इतके पैसे!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement