45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; मराठवाडा-खान्देश थेट कनेक्ट होणार, गेमचेंजर प्लॅन काय?

Last Updated:

Kannad Outram Tunnel: हा प्रकल्प केवळ रस्त्याचा नाही, तर उत्तर–दक्षिण वाहतुकीला सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक दिशा देणारा ठरणार आहे.

45 मिनिटांचा प्रवास थेट 15 मिनिटांत; मराठवाडा-खानदेश थेट कनेक्ट होणार, गेमचेंजर प्लॅन काय?
45 मिनिटांचा प्रवास थेट 15 मिनिटांत; मराठवाडा-खानदेश थेट कनेक्ट होणार, गेमचेंजर प्लॅन काय?
‎छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि खान्देश यांना जोडणाऱ्या प्रवासात आजवरचा सर्वात मोठा अडथळा ठरलेला कन्नड–औट्रम घाट लवकरच इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित बोगदा प्रकल्प निर्णायक टप्प्यात पोहोचला असून प्रत्यक्ष कामाला गती आली आहे. सध्या धोकादायक वळणांमुळे लागणारा 45 मिनिटांहून अधिक वेळ बोगदा पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पार करता येणार आहे.
‎या महामार्गामुळे शहरातून जाणारी सोलापूर–धुळे जोडणी अधिक सुलभ होणार आहे. मराठवाड्यातून खान्देशाकडे जाण्यासाठी लागणारी कसरत कमी होत उद्योग, व्यापार आणि दळणवळणाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
‎हा मार्ग गौताळा–औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य परिसरातून जात असल्याने परवानग्यांअभावी काम रखडले होते. पावसाळ्यात दरडी कोसळणे व अपघातांच्या घटनांनीही प्रवाशांची चिंता वाढवली होती. केंद्र व राज्यस्तरावर समन्वय साधत विशेष बैठका घेण्यात आल्या. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर प्रलंबित बाबींना मार्ग निघाला आणि पर्यावरणीय मंजुरीमुळे कामाला गती मिळाली.
advertisement
‎तांत्रिक वैशिष्ट्ये
सुमारे 5.5 किमी लांबीचा दुहेरी बोगदा असेल. ये-जा वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असेल. ताशी 100 किमी वेगासाठी रचना आहे. आपत्कालीन मार्ग, फायर-फायटिंग आणि सुरक्षा यंत्रणा असेल.
‎इको-सेन्सिटिव्ह नियमांचे पालन; वृक्षतोड टाळण्यासाठी डोंगराखालून बोगदा तयार करण्यात येईल.
खर्च व प्रगती
‎अंदाजे खर्च: 12434 ते 12600 कोटी यासाठी लागेल.
‎अलाईनमेंट मंजूर; केंद्र–राज्य समन्वयातून काम युद्धपातळीवर काम चालू आहे. मालवाहतूक जलद; घाटातील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल.
advertisement
‎सध्याच्या अडचणी काय आहेत?
‎अरुंद रस्ता, तीव्र उतार व 28 हून अधिक धोकादायक वळणे आहेत. ‎दरड कोसळण्याचा धोका आहे. अवजड वाहनांमुळे सातत्याने कोंडी व अपघात होण्याची शक्यता आहे.
‎बोगदा पूर्ण झाल्यानंतरचा परिणाम
‎प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घट होईल. इंधन बचत व वाहनांची कमी झीज होईल. अपघातांचा धोका कमी होईल. मराठवाडा–खान्देश अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
advertisement
‎नव्या मार्गाची जोडणी
‎उत्तर बाजू: चाळीसगाव तालुका (बोधरे परिसर)
‎दक्षिण बाजू: कन्नड तालुका (तलवाडा फाटा)
‎‎कन्नड शहरातील अवजड वाहतूक शहराबाहेर वळवणे शक्य होईल.
‎‎हा प्रकल्प केवळ रस्त्याचा नाही, तर उत्तर–दक्षिण वाहतुकीला सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक दिशा देणारा मराठवाडा–खान्देश विकासाचा कणा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; मराठवाडा-खान्देश थेट कनेक्ट होणार, गेमचेंजर प्लॅन काय?
Next Article
advertisement
ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement