संभाजीनगरमधील IT पार्कमध्ये 200 पोलिसांचा छापा, सेंटरमध्ये घुसताच जे पाहिलं... पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली, 27 तास छापेमारी!

Last Updated:

Sambhajinagar IT Park Cyber Crime : एका दिवसात 50 लाखांहून अधिक रक्कम उकळली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, 27 तास चाललेल्या या कारवाईत 114 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Sambhajinagar IT Park Cyber Crime
Sambhajinagar IT Park Cyber Crime
Sambhajinagar Cyber Crime News : संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियमसमोरील आयटी पार्कसमोर (Sambhajinagar IT Park) अचानक काही पोलिसांच्या गाड्या आल्या. एकापाठोपाठ एक गाड्यांच्या रांगा लागल्यानंतर नेमकं काय झालं? असा सवाल विचारला जाऊ लागला. पोलिसांनी तयारी पूर्ण केली अन् आयटी पार्कच्या कॉल सेंटरवर धाड मारली. आत घुसताच असं काही पाहिलं की पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली.

27 तास छापा, 114 आरोपींना अटक

संभाजीनगरमध्ये एका कॉल 5 सेंटरमधून थेट अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात होता. सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांकडून ई-कॉमर्स कंपन्यांचे व्हाऊचर खरेदीच्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. यातून एका दिवसात 50 लाखांहून अधिक रक्कम उकळली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, 27 तास चाललेल्या या कारवाईत 114 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
advertisement

119 लॅपटॉप, मोबाइल जप्त

या प्रकरणातील तीन आरोपी पसार आहेत, माहिती डीसीपी प्रशांत स्वामी भाविक यांनी दिली. भावेश प्रकाश चौधरी पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अब्दुल फारुक मुकदम शहा ही अटकेतील मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 7 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 119 लॅपटॉप, मोबाइल जप्त केले आहेत.

पोलिसांना कशी मिळाली हिंट?

advertisement
कॉल सेंटरमधून एका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढले होते. या रागातून त्याने पोलिसांना टीप दिली. पीआय गीता वागवडे आणि त्यांच्या टीमने या सेंटरवर पाळत ठेवत या रॅकेटची खातरजमा केली. माहिती जमा केल्यानंतर बागवडे आणि त्यांच्या टीमने सोमवारी रात्री छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. आतमध्ये घुसण्यासाठी विरोध करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कंपाउंड वॉलवरून उडी मारत आतमध्ये प्रवेश केला.
advertisement

जॉन खरा मास्टरमाईंड डॉन

संभाजीनगरच्या सेंटरमधील सर्व व्यक्ती अमेरिकेच्या जॉन या व्यक्तीसाठी काम करत होते. जॉन स्वत:ला 45 टक्के रक्कम घ्यायचा. तर इतर पार्टनरला जॉन 55 टक्के रक्कम वाटून टाकत असे. पोलिसांना या सेंटरवर अनेकदा संशय होता. पोलिसांनी आता कायदेशीर कारवाईला सुरूवात केली असून जॉनला देखील कारवाईची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरमधील IT पार्कमध्ये 200 पोलिसांचा छापा, सेंटरमध्ये घुसताच जे पाहिलं... पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली, 27 तास छापेमारी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement