लग्नात ओळख अन् प्रेम फुललं, पण शेवटी आयुष्यच उद्ध्वस्त झालं; प्रियकरानं दिव्यासोबत असं काय केलं?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमाच्या जाळ्यात ओढून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीची फसवणूक झाली आहे. मनाने खचलेली पण धैर्य न हरलेली दिव्या अखेर न्यायासाठी पुढे आली.

लग्नात ओळख अन् प्रेम फुललं, पण शेवटी आयुष्यच उद्ध्वस्त झालं; प्रियकरानं दिव्यासोबत असं काय केलं?
लग्नात ओळख अन् प्रेम फुललं, पण शेवटी आयुष्यच उद्ध्वस्त झालं; प्रियकरानं दिव्यासोबत असं काय केलं?
छत्रपती संभाजीनगर : ज्या लग्नसमारंभात दिव्याची (नाव काल्पनिक आहे) ओळख मनोहरशी झाली, तिथेच तिच्या आयुष्याचा काळोख सुरू झाला, असं म्हणावं लागेल. त्या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीतून प्रेमात झालं, आणि आता त्या प्रेमामुळेच तिची दुर्दशा झाली. लग्नाचं आमिष दाखवून मनोहर लिंबाजी चव्हाण (28, रा. गंगाखेड, जि. परभणी) या तरुणाने दिव्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, आणि शेवटी लग्नाला नकार देत तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.
प्रकरणात 23 वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या दिव्याने तक्रार दिली आहे. तिने सांगितले की, काही वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात तिची आणि मनोहरची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. दोघांमध्ये सातत्याने फोनवरून बोलणे सुरू झाले. मनोहरने लग्नाचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि 2022 ते जून 2025 दरम्यान विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. मात्र जुलैनंतर त्याने अचानक लग्न करण्यास नकार दिला.
advertisement
दिव्याने वारंवार त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने केवळ नकारच दिला नाही, तर तिच्या आणि तिच्या वडिलांना धमक्या दिल्या. इतकंच नव्हे, एकदा तर त्याने तिच्या वडिलांनाही हायवेमध्ये गाडीखाली उडवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर बनली की, दिव्याला स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. त्यातच मनोहरच्या काही नातेवाईकांनीही तिला मारहाण केली.
advertisement
मनाने खचलेली पण धैर्य न हरवलेली दिव्या अखेर न्यायासाठी पुढे आली. तिच्या तक्रारीनंतर क्रांती चौक ठाण्याच्या पोलिसांनी मनोहर लिंबाजी चव्हाण याला अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. जांबोटकर यांनी त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
2023 मध्ये दिव्या मनोहरच्या घरी गेली असता, त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्या वेळी ‘लग्न करीन’ या आश्वासनावर प्रकरण मिटवलं गेलं, पण पुन्हा विश्वासघात झाल्यावर दिव्याने गप्प न राहता थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
दिव्याची ही वेदनादायी कहाणी अनेक मुलींना विचार करायला लावणारी आहे. एका लग्नात झालेली ओळख तिच्यासाठी आयुष्यभराचं दुःख ठरली. प्रेमाच्या नावाखाली भावनांशी खेळ करणाऱ्यांनी आता यावरून शिकावं, कारण प्रत्येक ‘दिव्या’ आता गप्प राहणार नाही, ती न्यायासाठी आवाज उठवणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
लग्नात ओळख अन् प्रेम फुललं, पण शेवटी आयुष्यच उद्ध्वस्त झालं; प्रियकरानं दिव्यासोबत असं काय केलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement