advertisement

‘लाइन ब्लॉक’चा फटका; संभाजीनगर अन् नांदेड विभागातून धावणाऱ्या 11 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Last Updated:

‎जानेवारीत ‘लाइन ब्लॉक’चा फटका; 5 गाड्या पूर्ण रद्द, 2 अंशतः रद्द; 11 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल‎

‎जानेवारीत ‘लाइन ब्लॉक’चा फटका
‎जानेवारीत ‘लाइन ब्लॉक’चा फटका
‎छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात रुळ दुरुस्तीचं काम करण्यासाठी 3 ते 9 जानेवारीदरम्यान ‘लाइन ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या कामाचा थेट परिणाम संभाजीनगर तसेच नांदेड विभागातून धावणाऱ्या एकूण 11 गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
‎अंशतः रद्द होणाऱ्या गाड्या
‎दौंड–निजामाबाद (क्र. 11409) : 2, 3, 4, 5, 7 आणि 8 जानेवारी रोजी अंशतः रद्द. गाडी छत्रपती संभाजीनगर ते मुदखेडच धावेल. मुदखेड–निजामाबाद मार्ग रद्द.
‎निजामाबाद–पंढरपूर (क्र. 11413) : 3, 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी रोजी निजामाबाद–मुदखेड दरम्यान अंशतः रद्द.
‎पूर्णपणे रद्द गाड्या
‎निजामाबाद–नांदेड (77645) : 3 ते 9 जानेवारी — पूर्ण रद्द
advertisement
‎नांदेड–निजामाबाद (77646) : 3 ते 9 जानेवारी — पूर्ण रद्द
‎वेळापत्रक बदल आणि नियमन
‎विशाखापट्टणम–नांदेड (20821) आणि काचिगुडा–नरखेर (17641) : पुनर्नियोजन आणि नियमन.
‎उशिराने धावणाऱ्या गाड्या
‎मुंबई–लिंगमपल्ली (17057) : 3 जानेवारी — 50 मिनिटे उशीर
‎काचिगुडा–नगरसोल (17661) : 4 जानेवारी — नगरसोल आगमनात 2 तास उशीर
advertisement
‎नगरसोल–काचिगुडा (17661) : 8 व 9 जानेवारी — नगरसोलहून सुटण्यात 1 तास उशीर
‎नांदेड–मेडचल (77606) : 3 ते 9 जानेवारी — तब्बल 3 तास विलंब
‎भगत की कोठी–काचिगुडा (17606) : 2 जानेवारी — नांदेड विभागात 2 तास उशीराने धावेल
‎या लाइन ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रकाचा अवश्य विचार करावा, असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
advertisement
लोणावळा-कल्याण रेल्वे विभागात 'पॉवर ब्लॉक -
लोणावळा-कल्याण रेल्वे विभागात 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार असल्याने पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रेल्वे मार्गावरील प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे पुणे, मुंबई आणि अन्य राज्यांतून ये-जा करणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांना उशीर होणार असून, काही लोकल गाड्या निश्चित स्थळाच्या अलीकडेच थांबवण्यात येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘लाइन ब्लॉक’चा फटका; संभाजीनगर अन् नांदेड विभागातून धावणाऱ्या 11 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement