BJP: छ.संभाजीनगरमध्ये भाजपला 'पेपर' जाणार अवघड, सर्वाधिक बंडखोरांनी अडवली वाट!
- Published by:Sachin S
Last Updated:
आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांनी बंडखोर उमेदवारांच्या भेटी घेऊन मनधरणी केली. काही ठिकाणी यश आलं तर काही ठिकाणी अपयशी ठरले.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अनेक ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढत आहे. तर कुठे विरोधात लढत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची रांग लागली होती. त्यामुळे बंडखोरीना डोकं वर काढलं आहे. सर्वात जास्त बंडखोरीचा फटका हा भाजपला बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात जास्त बंडखोरी भाजपमध्ये झाली आहे तर शिवसेना शिंदे गटाला आणि एमआयएमला सुद्धा झटका बसला आहे. आज शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता बंडखोरांचा आकडा हा २५ वर पोहोचला आहे. तर इतर पक्ष मिळून तब्बल ४० जणांनी बंडखोरी केली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, यंदा छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी एकूण ४२ बहुसदस्यीय प्रभागात निवडणूक लढवली जात असून एकूण १२६ जागा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये ३ उमेदवार निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच सत्ताधारी भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरीची लागण झाली आाहे.
छत्रपती संभाजीनगर पालिकेत किती बंडखोरी?
भाजपा: 25 बंडखोर
शिवसेना (शिंदे): 10 - 12 बंडखोर
advertisement
शिवसेना (ठाकरे): 6 बंडखोर
राष्ट्रवादी (अजित पवार): 0
वंचित बहुजन आघाडी: 0
एम आय एम: 10
काँग्रेस: 0
विशेष म्हणजे, मागील ३ दिवसांपासून भाजपकडून बंडखोरांना थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांनी बंडखोर उमेदवारांच्या भेटी घेऊन मनधरणी केली. काही ठिकाणी यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं आहे.
view commentsLocation :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP: छ.संभाजीनगरमध्ये भाजपला 'पेपर' जाणार अवघड, सर्वाधिक बंडखोरांनी अडवली वाट!







