Open Pores : तेलकट त्वचा असलेल्यांसाठी नैसर्गिक पर्याय, चेहऱ्याची त्वचा होईल घट्ट, सहज - सोपे फेस पॅक

Last Updated:

चेहरा चांगला दिसावा यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत, पण यामधे असलेली रसायनं त्वचेला सूट होतीलच असं नाही. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले घरगुती फेस पॅक त्वचेला हानी न पोहोचवता उघडी छिद्रं म्हणजेच open pores घट्ट करण्यास मदत करतात. पाहूयात यासाठीचे खास फेस पॅक.

News18
News18
मुंबई :  चेहऱ्याची त्वचा चांगली राहावी यासाठी काही पर्याय घरातच उपलब्ध आहेत. त्वचेवरच्या उघड्या छिद्रांमुळे चेहऱ्यावर धुळीचे थर साचतात. यामुळे मुरुमं, ब्लॅकहेड्स आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवतात. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना ही समस्या जाणवते.
चेहरा चांगला दिसावा यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत, पण यातली रसायनं त्वचेला सूट होतीलच असं नाही. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले घरगुती फेस पॅक त्वचेला हानी न पोहोचवता उघडी छिद्रं म्हणजेच open pores घट्ट करण्यास मदत करतात. पाहूयात यासाठीचे खास फेस पॅक.
advertisement
मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक - मुलतानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि जास्तीचं तेल शोषून घेते. गुलाब पाणी थंड आणि टोनिंग एजंट म्हणून काम करते. मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळा आणि चेहऱ्याला लावा. कोरडं झाल्यावर साध्या पाण्यानं धुवा.
कोरफड जेल आणि काकडीचा रस - कोरफड त्वचेला हायड्रेट करते, तर काकडी टोन देते. काकडीचा रस आणि कोरफडीचा जेल मिसळा आणि पंधरा-वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा.
advertisement
अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस - अंड्याचा पांढरा भाग त्वचेला घट्ट करतो, तर लिंबातील आम्ल जास्तीचं तेल काढून टाकतं. हे एकत्र मिसळा आणि मास्क म्हणून लावा. ते सुकल्यानंतर थंड पाण्यानं धुवा.
बेसन, हळद आणि दह्याचा पॅक - हा पॅक मृत त्वचा काढून टाकण्यासाठी, छिद्रं घट्ट करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी मदत करतो. आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.
advertisement
बर्फ - थेट फेस पॅक नाही, पण, बर्फाचं मालिश हा त्वचा घट्ट करण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. दररोज सकाळी एक-दोन मिनिटं चेहऱ्यावर बर्फ चोळा.
मध आणि दालचिनी पॅक - मधामुळे त्वचा मॉइश्चराईझ होते आणि दालचिनी बॅक्टेरिया काढून छिद्रं साफ करते.
advertisement
चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटं तसंच राहू द्या.
ओटमील आणि दुधाचा पॅक - ओट्समुळे मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि दुधामुळे त्वचेला पोषण मिळतं.
या पॅकमुळे त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीत होते.
संत्र्याची साल आणि गुलाबपाणी - संत्र्यांच्या सालीची पावडर उघड्या छिद्रांना घट्ट करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
गुलाबपाण्यात मिसळा आणि लावा. या फेसपॅकचा नियमित वापर केल्यानं त्वचेला नैसर्गिक चमक देखील मिळेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Open Pores : तेलकट त्वचा असलेल्यांसाठी नैसर्गिक पर्याय, चेहऱ्याची त्वचा होईल घट्ट, सहज - सोपे फेस पॅक
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement